सार्वजनिक शौचालयांच्या दुरुस्तीसाठी १८ कोटींच कंत्राट देऊन दुरावस्था, खोल्या भाड्याने दिल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2020 07:44 PM2020-11-25T19:44:08+5:302020-11-25T19:44:24+5:30

परंतु ठेकेदाराला कडून शौचालयांची दैनंदिन साफसफाई सुद्धा केली जात नसून शौचालयांची दुरावस्था झालेली आहे .

18 crore for the repair of public toilets and rented out rooms | सार्वजनिक शौचालयांच्या दुरुस्तीसाठी १८ कोटींच कंत्राट देऊन दुरावस्था, खोल्या भाड्याने दिल्या

सार्वजनिक शौचालयांच्या दुरुस्तीसाठी १८ कोटींच कंत्राट देऊन दुरावस्था, खोल्या भाड्याने दिल्या

Next

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेने शहरातील पालिकेची शौचालये देखभाल - दुरुस्ती, नूतनीकरण व साफसफाई च्या कामासाठी तब्बल १८ कोटींचा ठेका दिला असून सदर ठेकेदार साफसफाई करत नसून उलट शौचालयातील खोल्या भाड्याने दिल्याचा धक्कादायक प्रकार भाजपच्याच नगरसेवकांनी उघडकीस आणून कारवाईची मागणी केली आहे . 

मीरा भाईंदर महापालिकेने शहरातील शौचालये हि  देखभाल - दुरुस्ती, नूतनीकरण व साफसफाई च्या कामासाठी तब्बल १८ कोटींचा ठेका हा मालाडच्या शाईन मेन्टेनन्स सर्व्हिसेस प्रा . लि . ह्या ठेकेदारास दिला आहे . ३ नोव्हेम्बर २०२० रोजी पालिकेने ठेकेदारास कार्यदेश दिला आहे . 

परंतु ठेकेदाराला कडून शौचालयांची दैनंदिन साफसफाई सुद्धा केली जात नसून शौचालयांची दुरावस्था झालेली आहे . त्यातच शौचालयातील सफाईकामगार साठी असलेली खोली चक्क महिना १० हजार रुपये भाड्याने दिली असल्याचा प्रकार भाईंदरच्या गणेश देवल नगर मधील शौचालयां मध्ये उघडकीस आला आहे . 

भाजपचे नगरसेवक पंकज पांडेय यांनीच सदर प्रकार उघडकीस आणला पांडेय सह नगरसेवक एड . रवी व्यास यांनी पालिका आयुक्तांकडे लेखी तक्रार केली आहे . सदर ठेकेदारास काळ्या यादीत टाकून ठेका रद्द करावा आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी व्यास व पांडेय यांनी तक्रारीत केली आहे 

Web Title: 18 crore for the repair of public toilets and rented out rooms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.