ठाणे स्थानकात भारतीय रेल्वेचा १७१ वा वाढदिवस साजरा

By अनिकेत घमंडी | Published: April 16, 2024 05:39 PM2024-04-16T17:39:32+5:302024-04-16T17:45:20+5:30

ठाणे रेल्वे प्रवासी संघटनेचे आयोजन

171st birthday celebration of indian railways at thane station | ठाणे स्थानकात भारतीय रेल्वेचा १७१ वा वाढदिवस साजरा

ठाणे स्थानकात भारतीय रेल्वेचा १७१ वा वाढदिवस साजरा

अनिकेत घमंडी,  डोंबिवली:भारतीय रेल्वेचा १७१वा वाढदिवस मंगळवारी ठाणे रेल्वे स्थानकात साजरा करण्यात आला. ठाणे रेल्वे प्रवासी संघटनेने त्याचे आयोजन केले होते, ठाणे ते कर्जत रेल्वे स्थानक पर्यन्त शटल सेवा सोडण्यापर्यन्त शांत बसणार नाही असा निर्धार संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी।केला. त्याबाबत त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया।दिली. सातत्याने नागरिकांनी मागणी करूनही रेल्वे प्रशासनावर त्याचा परिणाम होत नसल्याचे सांगण्यात आले.

ठाणे स्थानकातील ऐतिहासिक रेल्वे इंजिन बसवण्यात आले आहे त्या ठिकाणी १७१ वर्षांचा इतिहास माहितीपर लावण्यात यावा अशी मागणी देखील त्यांनी केली. तसेच या इंजिनाची ख्याती सर्वदूर जाऊन त्या स्मृती अजरामर} राहण्यासाठी सेल्फी पॉईंट असावा अशी सुविधा रेल्वेने द्यावी अशीही मागणी देशमुख यांनी केली. १७१ वर्षे झाली परंतु दिवसाला सुमारे सरासरी १२ अपघात होऊन प्रवाशांचा जीव धोक्यात जातो हे योग्य नाही, त्यामुळे ते अपघात शून्य प्रमाणात आणावेत यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे मत सुधाकर पतंगराव यांनी व्यक्त केले. त्यावेळी स्थानक प्रबंधक केशव तायडे, समाजिक कार्यकर्ते शिवराम मिश्रा, किशोर बोन्द्रे आदींसह लोहमार्ग पोलीस, अरपीएफ जवान, प्रवासी आदी उपस्थित होते.

भारतीय रेल्वेचा 171 वाढदिवस साजरा करीत असताना मुंबईतील उपनगरीय लोकल प्रवाशांचा प्रवास सुसह्य आणि किमान गर्दीचा व्हावा अशा अपेक्षा मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील लोकल प्रवाशांनी व्यक्त केल्या. यासाठी गेली 6 वर्षे रेल्वे बोर्डाकडे मंजुरी च्या प्रतिक्षेत असलेल्या बदलापूर व टिट वाळा लोकल 15 डबा चालविण्या च्या प्रकल्पाला  तात्काळ मंजुरी मिळावी व  सदर प्रकल्प युद्धपातळीवर पूर्ण करावा अशी महत्वाची  मागणी उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाने केली आहे. तसेच वेळा पत्रक बदलताना निदान कल्याण  किंवा ठाणे स्थानकातून कर्जत व कसारा मार्गावर लोकल फेर्‍या वाढवाव्यात  अशी माफक अपेक्षा व्यक्त केली. : मनोहर शेलार, संस्थापक अध्यक्ष, उपनगरी रेल्वे प्रवासी संस्था

Web Title: 171st birthday celebration of indian railways at thane station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.