शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी देऊन १६ वर्षीय तरुणीचा विनयभंग, आरोपीला बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 01:39 IST

कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी देऊन एका १६ वर्षीय तरुणीचा विनयभंग करणा-या अमित गुप्ता (१९) याला कापूरबावडी पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे.

ठाणे : कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी देऊन एका १६ वर्षीय तरुणीचा विनयभंग करणा-या अमित गुप्ता (१९) याला कापूरबावडी पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे. त्याला २९ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.माजिवडा सेवा रस्त्याच्या कडेला राहणाºया या मुलीची भिवंडीच्या काल्हेर भागात राहणाºया अमितबरोबर काही दिवसांपूर्वीच ओळख झाली होती. याच ओळखीचा फायदा घेऊन १५ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास त्याने तिला तिच्या घराजवळील रस्त्यातच थांबवून तिचा हात पकडला. तिच्या हातातील मोबाइल जबरदस्तीने हिसकावून भावाला आणि कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी देऊन तिला त्याच्या मोटारसायकलवर बसण्यास भाग पाडले. नंतर, घोडबंदर रोडवरील फाउंटन हॉटेल परिसरात नेऊन दमदाटी करून तिचा विनयभंग केला. छेडछाड करून तिच्या मोबाइलमधून अन्य कोणाला तरी मेसेज पाठवला. या सर्व प्रकारानंतर तिने त्याच्याविरुद्ध कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर त्याला अटक केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बन्सी बारावकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिसArrestअटकthaneठाणे