१६ वर्षाच्या मुलीचा ट्रक खाली चिरडून मृत्यू; उल्हासनगरमधील दुर्दैवी घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2022 18:02 IST2022-02-05T18:02:09+5:302022-02-05T18:02:15+5:30
उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेवाली नाका येथून शुक्रवारी सायंकाळी साडे पाच वाजता आत्माराम म्हात्रे हे मुलगी मानसीसह मोटरसायकली वरून जात होते.

१६ वर्षाच्या मुलीचा ट्रक खाली चिरडून मृत्यू; उल्हासनगरमधील दुर्दैवी घटना
सदानंद नाईक
उल्हासनगर : शहरातील हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेवाली नाका येथे शुक्रवारी सायंकाळी साडे पाच वाजता मोटारसायकलला ट्रकने जोरदार धडक दिली. मोटरसायकल वरून वडिला सोबत जाणाऱ्या १६ वर्षाच्या मानसी हिला चिरडून टाळले असून मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे.
उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेवाली नाका येथून शुक्रवारी सायंकाळी साडे पाच वाजता आत्माराम म्हात्रे हे मुलगी मानसीसह मोटरसायकली वरून जात होते. त्यावेळी डी डी-०१, एफ-९४१९ नंबरच्या भरधाव ट्रकने मोटरसायकलला जोरदार धडक दिली. यामध्ये १६ वर्षीय मानसी हिच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने, तिचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून ट्रक चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.