उल्हासनगरमध्ये १५२ धोकादायक इमारती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 03:35 IST2018-06-11T03:35:12+5:302018-06-11T03:35:12+5:30
महापालिकेने शहरात १५२ धोकादायक, तर १९ अतिधोकादायक अशा एकूण १७२ इमारती जाहीर करून त्या इमारतींना नोटिसा बजावल्या आहेत. अतिधोकादायक इमारतींचा वीज आणि पाणीपुरवठा खंडित करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

उल्हासनगरमध्ये १५२ धोकादायक इमारती
उल्हासनगर - महापालिकेने शहरात १५२ धोकादायक, तर १९ अतिधोकादायक अशा एकूण १७२ इमारती जाहीर करून त्या इमारतींना नोटिसा बजावल्या आहेत. अतिधोकादायक इमारतींचा वीज आणि पाणीपुरवठा खंडित करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.
उल्हासनगर पालिका आयुक्त गणेश पाटील यांनी उपायुक्त प्रभाग अधिकाऱ्यांसह विभागप्रमुखांची बैठक घेतली. बैठकीत शहरातील धोकादायक इमारतींचा आढावा घेतला असता अभियंता महेश शितलानी यांनी १५२ धोकादायक व १९ अतिधोकादायक इमारतींची यादी सादर केली. आयुक्तांनी धोकादायक इमारतींमधील हजारो नागरिकांना नोटिसा देऊन घर सोडण्याचे तसेच अतिधोकादायक इमारतींचा पाणी व वीजपुरवठा खंडित करा, असे आदेश प्रभाग अधिकाºयांना देण्यात आले. यापूर्वी काही धोकादायक इमारती लाखो रुपये खर्चून अत्याधुनिक मशीनने जनीनदोस्त केल्या होत्या. अशा प्रकारची कारवाई अपवादात्मकवेळी करता येईल, असे संकेत पाटील यांनी दिले.
महापालिकेने पावसाळ्यापूर्वी आपत्कालीन कक्षाची स्थापना करून विशेष पथकाची स्थापना केली. तसेच पथकाला कुदळ-फावडे, बोट यांच्यासह इतर साहित्य देऊन २४ तास तैनात राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मोठ्या व लहान नाल्यांची पावसाळ्यापूर्वी साफसफाईचे आदेश देऊन शहरात साचलेले कचºयाचे ढीग जादा यंत्रणा लावून उचलण्याचे आदेश दिले. गुरुवारी व शुक्रवारी आयुक्तांनी पालिका अधिकारी, महापौर मीना आयलानी यांच्यासमवेत दौरा करून पावसाळ्यापूर्वीच्या तयारीचा आढावा घेत पाहणी केली. आपत्कालीनवेळी नागरिकांसाठी पर्यायी व्यवस्था पालिकेकडे नसल्याचे उघड झाले आहे.
इमारतींच्या पुनर्बांधणीची मागणी
धोकादायक इमारतींत राहणाºया नागरिकांनी इमारतींच्या पुनर्बांधणीची मागणी पालिकेकडे केली आहे. वाढीव एफएसआय देऊन नवीन बांधकामांना परवानगी दिल्यास धोकादायक इमारतींच्या जागी नवीन इमारती उभ्या राहणार असल्याचे मत अनेक फ्लॅटधारकांनी व्यक्त केले आहे.