शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाच्या काहिलीत केवळ दहा दिवसांत १५० वेळा बत्ती गुल; डोंबिवलीतील दोन लाख ग्राहकांना मनस्ताप 

By अनिकेत घमंडी | Updated: March 11, 2026 10:25 IST

उन्हाचा पारा ४२ अंशावर गेलेला असतानाच डोंबिवलीमधील तांत्रिक बिघाडामुळे २ लाख वीज ग्राहकांची १ ते १० मार्च या दहा दिवसांत विविध ठिकाणी १५० वेळा बत्ती गुल झाली.

अनिकेत घमंडी लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : उन्हाचा पारा ४२ अंशावर गेलेला असतानाच डोंबिवलीमधील तांत्रिक बिघाडामुळे २ लाख वीज ग्राहकांची १ ते १० मार्च या दहा दिवसांत विविध ठिकाणी १५० वेळा बत्ती गुल झाली. त्यात मंगळवारी कहरच झाला. गणेश मंदिर, बाजी प्रभू फिडरवर ९ वेळा वीज खंडित झाली होती. 

महावितरण अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी फडके क्रॉस रस्त्यानजीक फते अली पथावर के. बी. वीरा शाळेसमोर रात्री साडेदहाच्या सुमारास ट्रान्सफॉर्मरमधून ५०० लिटर उकळत्या इंधनाच्या धारा रस्त्यावर पडल्या. रात्रीची वेळ असल्याने रहदारी कमी होती. त्यामुळे सुदैवाने मोठा अनर्थ टळला असला तरी त्या भागातील हजारो ग्राहकांना दोन तास घामाच्या धारा आणि अंधारात राहावे लागले. 

महावितरणने लगेचच त्या भागातील ट्रान्सफॉर्मरचे काम सुरू केले. वाढता पारा आणि त्यात वीज समस्या आल्याने ग्राहकांचा मनस्ताप वाढला होता. दहावी, बारावीच्या आणि शालेय, महाविद्यालयीन परीक्षांचा कालावधी असताना समस्या येत असल्याने पालक चिंतित होते. डोंबिवली शहरात महावितरणच्या ३० फिडरद्वारे दोन लाख ग्राहकांना वीजपुरवठा केला जातो. त्यामध्ये दहा दिवसांत १५० वेळा वीज खंडित झाल्याने नागरिक हैराण आहेत.  

कचरागाडीची धडक :  सोमवारच्या फते अली रस्त्यावरील ट्रान्सफॉर्मरला मनपाच्या कचऱ्याच्या आरसी गाडीने धडक दिल्यामुळे बिघाड घडल्याची प्राथमिक माहिती आहे, त्याबाबत माहिती घेणे सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्या ठिकाणी टाकल्या जाणाऱ्या कचऱ्याबाबत हरकतीचे पत्र महापालिका मनपाच्या घनकचरा विभागाला देणार असून, जिथे ट्रान्सफॉर्मर तिथे कचरा नकोच, अशी महावितरणची ठोस भूमिका आहे.

फते अली रस्त्यावरील महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरमधून ५०० लिटर इंधन रस्त्यावर पडले ते यंत्र निकृष्ट दर्जाचे होते का, याची सखोल चौकशी झाली पाहिजे. मार्चच्या दहा दिवसांत १५० वेळा वीज खंडित झाल्याची माहिती समोर येत आहे. हे गंभीर असून, सर्वाधिक वीज बिल भरणाऱ्या डोंबिवलीकरांनी हे का सहन करावे? वीज नियामक आयोगाकडे याबाबत दाद मागावी लागणार आहे. राजीव तायशेटे, अभ्यासक, वीज नियामक आयोग 

English
हिंदी सारांश
Web Title : Dombivli Grapples with Frequent Power Outages Amidst Scorching Heat

Web Summary : Dombivli residents are facing severe inconvenience due to frequent power outages. In the first ten days of March, there were 150 outages, impacting two lakh consumers. A transformer failure caused further disruption, leaving thousands without power for hours amidst rising temperatures and ongoing exams.
टॅग्स :dombivaliडोंबिवली