लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: बेकायदेशीरपणे गोमांसची विक्री करणाऱ्या ट्रक मालकासह दोघांना शुक्र वारी राबोडी पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून पाच टन आठशे किलो गोमांस हस्तगत केले आहे. या प्रकरणात दुसºया ट्रकचा चालक मात्र पसार झाला आहे.राबोडी पोलिसांना एका खबºयाने दिलेल्या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र शिरतोडे यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे यांच्या पथकाने राबोडी येथील अग्निशमन केंद्राजवळ साकेत रोड भागात सापळा रचून संशयास्पद आलेल्या दोन ट्रकची २८ मे रोजी झडती घेतली. दरम्यान, एका ट्रकमधून चालक ट्रक सोडून फरार झाला. त्यामुळे पोलिसांना संशय बळावला. पोलीस पथकाने दोन्ही ट्रकची तपासणी केल्यानंतर त्यात बेकायदेशीर वाहतूक करण्यात येत असलेल्या पाच टन ८०० किलो गोमांस आढळले. पोलिसांनी एका ट्रकचे चालक आणि मालक याना अटक केल्याची माहिती राबोडी पोलिसांनी दिली.
राबोडीत १५ लाखांचे गोमांस हस्तगत: ट्रक मालकासह दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2021 21:59 IST
बेकायदेशीरपणे गोमांसची विक्री करणाऱ्या ट्रक मालकासह दोघांना शुक्र वारी राबोडी पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून पाच टन आठशे किलो गोमांस हस्तगत केले आहे.
राबोडीत १५ लाखांचे गोमांस हस्तगत: ट्रक मालकासह दोघांना अटक
ठळक मुद्देराबोडी पोलिसांची कारवाई