शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणला वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी 15 दिवसांचा अल्टीमेटम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 20:03 IST

डोंबिवली शहर शून्य भारनियमन मुक्त असताना, तसेच येथील ग्राहक हा राज्यामध्ये सर्वाधिक वीज बील सुरळीत भरणारा असूनही काही महिन्यांपासून वीज पुरवठा खंडीत होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत

डोंबिवलीडोंबिवली शहर शून्य भारनियमन मुक्त असताना, तसेच येथील ग्राहक हा राज्यामध्ये सर्वाधिक वीज बील सुरळीत भरणारा असूनही काही महिन्यांपासून वीज पुरवठा खंडीत होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. शहरातील एकही प्रभाग असा नाही की जेथे वीजेची समस्या नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांना त्यांची कार्यक्षमता सुधारण्यासाठी पंधरा दिवसांचे अल्टीमेटम देण्यात येत असल्याचे आदेश राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले आहेत.

सोमवारी संध्याकाळी वीज पुरवठा खंडीत होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने त्रस्त झालेल्या नागरिकांचे गाऱ्हाणे मांडण्यासाठी भाजपाचे नगरसेवक एकत्र आले होते. पक्षाच्या बैठकीआधी त्यांनी सगळयांनी राज्यमंत्र्यांची भेट घेत व्यथा मांडली. त्यानूसार चव्हाण यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता धनराज बिक्कड यांच्यासमवेत चर्चा केली. त्यावेळी झालेल्या बैठकीला आमदार निरंजन डावखरे, नगरसेवक मुकुंद पेडणेकर, मंदार टावरे, नीलेश म्हात्रे संदीप पुराणिक, राजन आभाळे, मंडल शहर अध्यक्ष संजीव बीडवाडकर, रवीसिंग ठाकूर, अमित कासार यांच्यासमवेत अन्य नगरसेवक, नागरिक उपस्थित होते. गेल्या दोन महिन्यांपासून म्हात्रे नगर प्रभाग क्र. 67 व सभोवतालच्या परिसरात वारंवार विद्युत पुरवठा खंडित होण्याच्या समस्येचे पुर्णत: निराकरणासाठी पेडणेकर यांनी ते स्वत: प्रचंड त्रस्त असल्याचे सांगितले. त्यानंतर जीवनप्रभा सोसायटीचे रहिवासी विराज सिन्हा, विनीत सदनच्या स्मिता राजे, त्रिवेणी इमारतीचे ए. डिमेलो, नवसाई प्रसाद आदी सोसायट्यांमधील दक्ष नागरिकांनी त्यांना भेडसावणारा त्रास सर्वांसमोर सांगितला. त्यावर बिक्कड यांनी सामस्या आहेत, हे मान्य करत नागरिक त्रस्त असून लवकरच सगळयांना दिलासा मिळेल असे आश्वासन दिले.

आगामी दहा दिवसांत रिंगरुट चे काम पूर्ण होणार असून साधारणत: पंधरवड्यात शहरातील बहुतांशी ठिकाणच्या महावितरण संदर्भातील समस्या सुटतील असे ते म्हणाले. विविध प्रभागांमध्ये लावण्यात आलेले निकृष्ट दजार्चे डी. ओ. व कनेक्टर सप्टेंबर 2019 च्या शेवटपर्यंत तातडीने बदलून उच्च दजार्चे डी. ओ. व कनेक्टर तसेच इतर काही आवश्यक कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिल्याचे ते म्हणाले. तसेच महावितरणच्या सर्वच अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्यांची कार्यक्षमता सुधारण्याची सूचना केली. 

टॅग्स :electricityवीजdombivaliडोंबिवलीBJPभाजपा