उल्हासनगर महापालिकेकडूुन अभययोजनेंतर्गत एका आठवड्यात १५ कोटीची वसुली, २०० कोटीचे टार्गेट गाठणार?
By सदानंद नाईक | Updated: March 3, 2025 20:15 IST2025-03-03T20:15:08+5:302025-03-03T20:15:20+5:30
Ulhasnagar Municipal Corporation: महापालिकेने मालमत्ता कर विभागासाठी तीन टप्यात लागू केलेल्या अभययोजने अंतर्गत ७ व्या दिवसी १५ कोटी पेक्षा जास्त वसुली झाल्याची माहिती उपायुक्त अजय साबळे यांनी दिली. कर वसुलीसाठी सर्व विभाग प्रमुखांना ऐक तास अभय योजनेचे काम करून, कमीतकमी २० घरांना भेटी देण्याचे आदेश आयुक्तानी काढले आहे.

उल्हासनगर महापालिकेकडूुन अभययोजनेंतर्गत एका आठवड्यात १५ कोटीची वसुली, २०० कोटीचे टार्गेट गाठणार?
- सदानंद नाईक
उल्हासनगर - महापालिकेने मालमत्ता कर विभागासाठी तीन टप्यात लागू केलेल्या अभययोजने अंतर्गत ७ व्या दिवसी १५ कोटी पेक्षा जास्त वसुली झाल्याची माहिती उपायुक्त अजय साबळे यांनी दिली. कर वसुलीसाठी सर्व विभाग प्रमुखांना ऐक तास अभय योजनेचे काम करून, कमीतकमी २० घरांना भेटी देण्याचे आदेश आयुक्तानी काढले आहे.
उल्हासनगर महापालिका आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी नागरिक व राजकीय नेत्यांच्या आग्रहाखातर मालमत्ता कर विभागासाठी अभय योजना तीन टप्प्यात लागू केली. योजनेचा पहिला टप्प्या २४ फेब्रुवारी ते ६ मार्च दरम्यान असून थकबाकीची एकत्रित रकम भरल्यास त्यावरील दंड व व्याज १०० टक्के माफ होणार आहे. तर दुसरा टप्पा ७ ते १२ मार्च असून थकबाकीची एकत्रित रक्कम भरल्यास ७५ टक्के दंड व व्याज माफ होणार आहे. तर तिसरा टप्पा १३ ते १८ मार्च दरम्यान असून ५० टक्के दंड व व्याज माफ होणार आहे. अभय योजनेच्या सातव्या दिवसी १५ कोटी पेक्षा जास्त वसुली झाली असून आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी सर्व विभाग प्रमुखांना ऐक तास अभय योजनेचे काम व कमीतकमी २० घरांना भेटी देण्याचे आदेश काढले.
अतिरिक्त आयुक्त किशोर गवस, उपायुक्त विशाखा मोटघरे, उपायुक्त अजय साबळे आदिनी वसुली जोमाने करण्यासाठी बैठक घेऊन रणनीती आखली आहे. ३ मार्च पर्यंत मालमत्ता कर विभागाने एकूण वसुलीचा ९० कोटीचा टप्पा गाठला असून २०० कोटीचे वसुली टार्गेट पूर्ण होणार का? असा प्रश्न निर्माण झाला.