शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
4
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
5
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
6
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
7
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
8
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
9
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
10
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
11
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
12
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
13
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
14
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
15
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
16
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
17
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
18
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
19
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
20
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?

ठाणे जिल्ह्यात गुरुवारी कोरोनाचे १४०८ रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2020 04:05 IST

कल्याण-डोंबिवली परिसरात ३२९ रुग्णांची वाढ झाली असून १० जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत २५ हजार ५६० रुग्ण बाधित झाले आहेत.

ठाणे : जिल्ह्यात कोरोनाच्या एक हजार ४०८ रुग्णांची गुरुवारी वाढ झाली. यामुळे जिह्यातील रुग्णसंख्या आता एक लाख ११ हजार २५९ झाली आहे. तर, ३६ रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या तीन हजार १७८ झाली.ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात कोरोनाचे १७० रुग्ण आढळल्यामुळे शहरात २४ हजार १३ रुग्णांची नोंद आतापर्यंत करण्यात आली. याशिवाय, सहा जणांचा मृत्यू झालेला आहे. यामुळे आजपर्यंत ७७० जणांच्या मृत्यूची नोंद ठाणे शहर परिसरात झाली. याप्रमाणेच कल्याण-डोंबिवली परिसरात ३२९ रुग्णांची वाढ झाली असून १० जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत २५ हजार ५६० रुग्ण बाधित झाले आहेत.नवी मुंबई महापालिकेत सर्वाधिक ४७७ रुग्णांसह पाच जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. या शहरात आतापर्यंत २२ हजार २७५ बाधितांची, तर मृतांची संख्या ५२५ वर गेली आहे. उल्हासनगर महापालिका परिसरात ३४ रुग्ण आढळले आहेत.भिवंडी महापालिका क्षेत्रात गुरुवारी २६ रुग्ण नव्याने सापडले आहेत. आता या शहरात चार हजार १० बाधितांची संख्या झाली आहे. मीरा-भार्इंदरमध्ये १७१ रुग्णांसह पाच जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.दिवसभरात अंबरनाथमध्ये ३९ रुग्णांची वाढ झाली आहे. आता बाधितांची संख्या चार हजार ५८५ झाली. बदलापूरमध्ये ६७ रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधितांची संख्या तीन हजार ६७० झाली. त्यामुळे मृत्यूची संख्या ६५ झाल्याची नोंद करण्यात आली आहे.>वसई-विरारमध्येसहा रुग्णांचा मृत्यूवसई-विरार शहरात गुरुवारी सहा रुग्णांचा मृत्यू झाला, तर दिवसभरात १८१ नवीन रुग्ण आढळून आले. दरम्यान, ३१४ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले. यामुळे १२ हजार ७४१ रुग्णांनी आजवर कोरोनावर मात केली आहे.वसई-विरार शहर महापालिका हद्दीत गुरुवारी १८१ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असल्याने आता एकूण बाधित रुग्णांची संख्या १५ हजार २२४ वर पोहचली आहे. तर गुरुवारी सहा रुग्णांचा मृत्यू झाल्याने पालिका हद्दीत आजवर एकूण ३२३ रुग्ण मयत झाले आहेत. त्यासोबत शहरात एकूण २ हजार १६० रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत.>रायगडमध्ये २४ तासांत ५३५ नवीन रुग्णांची नोंदअलिबाग : रायगड जिल्ह्यात गुरुवार २० आॅगस्ट रोजी ५३५ नव्या कोरोना पॉझिटिव्ह रु ग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे बाधित रु ग्णांची संख्या २२ हजार २०५ पोहोचली आहे. गुरुवारी दिवसभरात पनवेल महानगरपालिका क्षेत्रात २१२, पनवेल ग्रामीणमध्ये ५५, उरण १६, खालापूर २४, कर्जत २२,असे ५३५ रुग्ण सापडले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस