शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात ३ वर्षात १४ धोकादायक इमारती जमीनदोस्त इमारतधारकांना दीड कोटीचे बिल

By सदानंद नाईक | Updated: February 27, 2026 15:18 IST

Ulhasnagar News: धोकादायक इमारतीपासून जनसामान्य नागरिकांना धोका निर्माण झाल्यावर, महापालिकेने पुढाकार घेऊन खाजगी ठेकेदारा मार्फत या इमारतीवर तोडक कारवाई केली.

- सदानंद नाईक उल्हासनगर - धोकादायक इमारतीपासून जनसामान्य नागरिकांना धोका निर्माण झाल्यावर, महापालिकेने पुढाकार घेऊन खाजगी ठेकेदारा मार्फत या इमारतीवर तोडक कारवाई केली. ३ वर्षात ऐकून १४ धोकादायक इमारतीवर तोडक कारवाई करून, तोडू कारवाईसाठी आलेला दीड कोटींचा खर्च इमारतधाराकांच्या मालमत्ता करात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती गणेश शिंपी यांनी दिली.

उल्हासनगरात इमारती व इमारतीचे स्लॅब कोसळून अनेकांचे बळी जाऊन जखमीची संख्या मोठी आहे. तर शेकडो नागरिक बेघर झाले आहे. यामध्ये मृत्यू झालेल्या कुटुंबांना अध्यापही आर्थिक मदतीच्या प्रतीक्षेत असून बहुतांश इमारतीची पुनरबांधणी झाली नाही. धोकादायक इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आल्यावर राज्य शासनाने अवैध बांधकामे नियमित करण्याच्या अध्यादेशात बदल करून धोकादायक इमारत पुनर्वसनाचा पर्याय सुचवीला. दरम्यान अवैध बांधकामे नियमित करणे व धोकादायक इमारतीची पुनरबांधणी रखडल्याचे ऐकून चित्र आहे. महापालिका अतिक्रमण विभागाने खाजगी ठेकेदाराच्या मदतीने गेल्या ३ वर्षात ऐकून १४ इमारतीवर तोडक कारवाई केली.

१४ इमारतीच्या तोडक कारवाई पोटी ठेकेदाराने तब्बल १ कोटी ५० लाख ८ हजार ६९७ रुपयाचे बिल महापालिकेला पाठविले. तोडक कारवाई पोटी आलेले दीड कोटीचे बिल हे तोडक इमारतीच्या मालमत्ताधाराकांच्या मालमत्ता करात सामाविष्ट करण्यात येणार आहे. अशी माहिती सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली. इमारत तोडक कारवाई करताना इमारती मधून निघणारे लोखंड व इतर साहित्याचे काय झाले? याचा हिशोब ठेकेदाराने महापालिका अतिक्रमण विभागाला दिला का? त्या साहित्य व लोखंडाचे काय झाले? आदीची माहिती तोडक कारवाई झालेले इमारतधारक महापालिकेला विचारणार आहेत. असे अनेकांचे म्हणणे आहे.

अनेक धोकादायक इमारती तोडक कारवाईच्या प्रतिक्षेत शहरांत अनेक धोकादायक इमारती बेवारसपणे उभ्या आहेत. या इमारतीपासून सर्वसामान्य नागरिकांना धोका निर्माण होण्यापूर्वी इमारतीवर कारवाईची मागणी होत आहे.

तोडक कारवाईच्या बिलावर संशय धोकादायक इमारतीची तोडक कारवाई केल्यानंतर त्याचे सविस्तर बिल ठेकेदाराने महापालिकेला देणे बंधनकारक आहे. तसेच या बिलाबाबत इमारतधारकांना माहिती देऊन तोडक कारवाई वेळी निघणारे लोखंड व इतर साहित्याची कशी विल्हेवाट लावली. याबाबत माहिती दिली जात नसल्याने, लाखोच्या बिलावर संशय निर्माण झाला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Ulhasnagar: 14 Dangerous Buildings Demolished, Residents Face ₹1.5 Crore Bill

Web Summary : Ulhasnagar demolished 14 dangerous buildings in 3 years. Residents now face ₹1.5 crore bill for demolition costs added to property taxes. Questions arise about salvaged materials.
टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरthaneठाणे