जिल्ह्यात १३०० अंगणवाड्यांना नळाचे पाणी पाेहाेचलेले नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 12:31 AM2021-03-07T00:31:50+5:302021-03-07T00:32:30+5:30

उन्हाळ्यातील पाणीटंचाईचा करावा लागताे सामना

1300 Anganwadas in the district have not received tap water | जिल्ह्यात १३०० अंगणवाड्यांना नळाचे पाणी पाेहाेचलेले नाही

जिल्ह्यात १३०० अंगणवाड्यांना नळाचे पाणी पाेहाेचलेले नाही

Next

सुरेश लोखंडे

ठाणे : कोरोनावरील उपाययोजनेच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यातील एक हजार ६०३ अंगणवाड्या अद्याप बंदच आहे. या अंगणवाड्यांच्या सोयी-सुविधेच्या दृष्टीने विचार करता येथील बालकांसाठी पिण्याच्या पाण्याची तात्पूर्ती व्यवस्था केलेली आहे. मात्र, यापैकी तब्बल एक हजार ३०७ अंगणवाड्या नळपाणी पुरवठ्याच्या प्रतीक्षेत आहेत. उन्हाळ्यातील पाणीटंचाई आधीच त्यांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

जिल्ह्याच्या ग्रामीण व दुर्गम भागातील गावपाड्यांमध्ये एक हजार ६०३ अंगणवाड्या कार्यरत आहेत. यापैकी २९८ अंगणवाड्यांना नळपाणीपुरवठा केलेला आहे. उर्वरित ५४८ अंगणवाड्यांच्या नळजोडणीचे काम प्रगतीवर असल्याचा दावा ठाणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाने केला आहे. या अर्धवट अंगणवाड्यांसह ६४९ अंगणवाडीकेंद्रांनाही नळाद्वारे पाणीपुरवठा सुरू नाही. यांच्या या पाणीपुरवठ्यासाठी पाणीपुरवठा विभागाकडून कार्यवाही सुरू असल्याचे सुतोवाच या महिला व बालविकास विभागाने केले आहे.  कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग झटत आहे. त्यास अनुसरून शाळा आणि अंगणवाड्या बंद आहेत. अंगणवाडीकेंद्रांचा विचार करता ३०० अंगणवाड्यांना नळजोडणी असून, तब्बल एक हजार ३००पेक्षा अधिक अंगणवाड्यात अद्यापही नळाचे पाणी नाही.

जिल्ह्यातील अंगणवाड्यांमधील नळ पाणीपुरवठ्याची सद्य:स्थिती खालीलप्रमाणे आहे.

प्रकल्प    अंगणवाड्या    नळजोडणी    अर्धवट    प्रतीक्षेत
कल्याण    १२४    ४५    ५१    ३० 
शहापूर    २७७    ३३    १०१    १४३ 
डोळखांब    २८३    २६    ९५    १६२
मुरबाड-१    १९१    ०१    ११५    ७५
मुरबाड-२    १९४    ०१    १२०    ७३
भिवंडी-१    २०६    १०१    ५०    ५५
भिवंडी-२    २२२    ७०    ८७    ६५
अंबरनाथ    १०६    २१    ३९    ४६

एकूण अंगणवाड्या - १६०३ 

नळजोडण्या नसलेल्या - १३०७

पाणीपुरवठ्यासाठी गावकरी आग्रही
ठाणे : अंगणवाडीत नळ पाणीपुरवठ्यासाठी आता जिल्ह्यातील गावकरी सामाजिक संघटनांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेसह महिला बालविकास विभागाचे दरवाजे ठोठावण्याच्या पवित्र्यात आहेत. यावर जिल्हा परिषदेकडून आता काय हालचाली होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. 

 

Web Title: 1300 Anganwadas in the district have not received tap water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे