१३ पोलीस निरीक्षकांची अदलाबदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:41 IST2021-07-28T04:41:44+5:302021-07-28T04:41:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मीरा रोड - मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयातील १३ पोलीस निरीक्षक व २ सहायक ...

१३ पोलीस निरीक्षकांची अदलाबदली
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरा रोड - मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयातील १३ पोलीस निरीक्षक व २ सहायक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये आयुक्तालय झाल्यानंतर इतक्या मोठ्या संख्येने पहिल्यांदाच हा फेरबदल करण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास बर्वे यांची नया नगर पोलीस ठाण्यातून वालीव पोलीस ठाण्यात बदली झाली आहे, तर वालीव पोलीस ठाण्याचे प्रभारी विलास चौगुले यांची नियोजित पेल्हार पोलीस ठाण्यात नियुक्ती केली गेली आहे. नालासोपारा पोलीस ठाण्याचे प्रभारी वसंत लब्दे यांची आर्थिक गुन्हे शाखेत बदली झाली असून, लब्दे यांच्या जागी विरार वाहतूक शाखेचे विलास सुपे यांना नियुक्त केले आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे विजयसिंग बागल यांची मीरा रोड पोलीस ठाण्याचे प्रभारी म्हणून नियुक्ती केली असून, तेथे कार्यरत वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांची नियंत्रण कक्षात बदली केली आहे.
प्रशासनात असलेले राजू माने यांना अर्नाळा पोलीस ठाणे प्रभारी म्हणून नेमले आहे. अर्नाळा पोलीस ठाण्याचे निरीक्षक महेश शेट्ये यांना पोलीस प्रशासन शाखेत नियुक्त केले आहे. मध्यवर्ती गुन्हे पथकाचे निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांची नियुक्ती नया नगर पोलीस ठाण्यात झाली आहे, तर नालासोपारा पोलीस ठाण्यात निरीक्षक समीर अहिरराव यांना गुन्हे शाखेत नियुक्त केले आहे.
विरार पोलीस ठाण्यात निरीक्षक विवेक सोनवणे यांना सुरक्षा शाखेत नेमले आहे. तुळींज पोलीस ठाण्याचे निरीक्षक गंगाराम वळवी यांना विरार पोलीस ठाण्यात नेमले आहे, तर एसीबी मुंबई येथील निरीक्षक सुशीलकुमार शिंदे यांची नवघर पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. नवघरचे रोशन देवरे व तुळींजचे संदेश पलांडे या दोन सहायक पोलीस निरीक्षकांची गुन्हे शाखेत बदली झाली आहे.