कल्याण डोंबिवलीत कोरोनाचे १,२४४ नवे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:41 IST2021-04-04T04:41:43+5:302021-04-04T04:41:43+5:30
कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोनामुळे शनिवारी चार जणांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत शहरात एक हजार २६६ जणांचा ...

कल्याण डोंबिवलीत कोरोनाचे १,२४४ नवे रुग्ण
कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोनामुळे शनिवारी चार जणांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत शहरात एक हजार २६६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर नव्याने एक हजार २४४ रुग्ण आढळले.
सध्या शहरात नऊ हजार ७९९ रुग्ण उपचार घेत आहेत. उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७१ हजार ५५८ आहे. शनिवारी दिवसभरात ८७६ जणांचा डिस्चार्ज मिळाला. शनिवारी आढळलेल्या नव्या आकडेवारीनुसार कल्याण पश्चिमेत ४२२ तर डोंबिवली पूर्व भागात ३७१ रुग्ण आढळले आहेत.
कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने महापालिकेने विविध निर्बंध लादले आहेत. मात्र, त्याचा काही उपयोग होताना दिसून येत नाही. नागरिक, व्यापारी, प्रवासी यांच्याकडून मोठ्या प्रमाणात कोरोना नियमावलीचे उल्लंघन होत असल्याने ही आकडेवारी वाढत आहे. दुसरीकडे महापालिकेने कोरोना टेस्टिंगचे प्रमाण वाढविल्याने रुग्ण वाढत असल्याचा दावा केला जात आहे. महापालिकेने कोरोनावर मात करण्यासाठी पुन्हा विविध उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. दोन दिवसांपूर्वी ३० खाजगी रुग्णालयांना कोविड रुग्णालयाचा दर्जा दिला होता. त्यात वाढ करून आत्तापर्यंत ४० खाजगी रुग्णालये काेविडवर उपचार करीत आहेत. त्याचबराेबर महापालिकेची कोविड रुग्णालये सुरू करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे.
----------------