अत्याचारप्रकरणी १२ वर्षे कारावास

By Admin | Updated: June 19, 2016 02:22 IST2016-06-19T02:22:03+5:302016-06-19T02:22:03+5:30

भिवंडीतील रुग्णालयात अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी २८ वर्षीय कलंदरला ठाणे विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवून १२ वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली.

12 years imprisonment for torture | अत्याचारप्रकरणी १२ वर्षे कारावास

अत्याचारप्रकरणी १२ वर्षे कारावास

ठाणे : भिवंडीतील रुग्णालयात अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी २८ वर्षीय कलंदरला ठाणे विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवून १२ वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली.
कलंदर उर्फ दादू कादर बादशाह शेख (२८) असे आरोपीचे नाव आहे. डिसेंबर २०१३ मध्ये परिसरातील ६ वर्षीय मुलीला त्याने स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर नेऊन तिच्यावर अत्याचार केला.
हा प्रकार मुलीच्या वडीलांच्या निदर्शनास येताच त्यांनी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. न्यायालयाने त्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. शुक्रवारी याप्रकरणी निकाल देताना, १२ वर्षे कारावासासह २५ हजार रुपये दंड ठोठावला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 12 years imprisonment for torture