श्री कौपिनेश्र्वर मंदिरात लावली १११ फुटी अगरबत्ती
By प्रज्ञा म्हात्रे | Updated: January 22, 2024 19:46 IST2024-01-22T19:46:06+5:302024-01-22T19:46:22+5:30
२३ दिवस या अगरबत्तीचा सुगंध पाचशे मीटर पर्यंत दरवळू शकतो

श्री कौपिनेश्र्वर मंदिरात लावली १११ फुटी अगरबत्ती
ठाणे: अयोध्यायेथे राममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यामध्ये रामनामाचा जल्लोष केला जात असताना सर्व वातावरण राम झाले असतानाएका नामवंत अगरबत्तीच्या ब्रँडने श्री कौपिनेश्र्वर मंदिरात १११ फुटी अगरबत्ती लावली. या अगरबत्तीचे उद्घाटन ती प्रज्वलित करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
२३ दिवस या अगरबत्तीचा सुगंध पाचशे मीटर पर्यंत दरवळू शकतो असं या अगरबत्तीच्या ब्रँड पार्टनर दानिश शेख यांनी सांगितले. तब्बल २३ दिवस १८ कुशल कामगारांनी ही अगरबत्ती बनवली आहे. या ब्रँडचे संचालक अर्जुन रंगा आणि किरण रंगा यांनी या अगरबत्तीचा सुगंध बनवला आहे. यात वापरण्यात आलेले घटक हे पूर्णतः नैसर्गिक असून त्यात मध, गूळ, सँडल पावडर, अशा अनेक घटकांचा समावेश आहे.
मैसूर येथे या ब्रँडच्या अगरबत्ती चा प्लांट असून तेथेही अगरबत्ती तयार करण्यात आलेली आहे. एका ट्रक मध्ये वेगवेगळे क्यूब करून या अगरबत्ती आणण्यात आली आणि मंदिरात पोहोचल्यावर हे क्यूब एकमेकांना जोडण्यात आले त्यासाठी चार तास लागले असे शेख म्हणाले. संपूर्ण देश रामाचा उत्सव साजरा करत आहे या उद्देशानेच आम्हीही अगरबत्ती तयार केली असल्याचे शेख यांनी सांगितले.