लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : राष्ट्रीय बंजारा परिषद या संघटनेच्या ठाणे जिल्हा शाखेतर्फे सोमवारी धनतेरसच्या दिवशी पोलिसांना ११०० फराळाच्या डब्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी संघटनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय राठोड, शहरअध्यक्ष देवराज राठोड, सामाजिक कार्यकर्ते गोर प्रकाश राठोड आदी उपस्थित होते. गोरधर्मपीठाचे संस्थापक तथा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष किसन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्र म राबविण्यात आला.सामान्य नागरिकांना कोणताही सण, उत्सव, मिरवणूक, आनंदाने साजरा करता यावा म्हणून स्वत:च्या कुटूंबाला सोडून दिवसरात्र, २४ तास १२ महिने हे पोलीस कार्यरत असतात. तटस्थपणे तैनात राहून कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि सण उत्सव सुरळीत पार पडण्यासाठी खाकी वर्दीतला माणूस सदैव कार्यरत असतो. गुन्हेगार आणि पोलीस यापलीकडे पोलीस आपले मित्र आहेत, ही भावना आणि हा संदेश समाजाला मिळण्यासाठी राष्ट्रीय बंजारा परिषद या संघटनेच्या वतीने हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. पोलिसांचीदिवाळी गोड व्हावी म्हणून कर्तव्यावर हजर असलेल्या पोलिसांना हे फराळाच्या डब्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्र मांतर्गत ठाण्यातील विविध पोलीस ठाण्यात फराळाच्या ११०० डब्यांचे वाटप ५ नोव्हेंबर रोजी करण्यात आले. या उपक्र मास सोमवारी सकाळी ९ वाजेपासून कासारवडवली पोलीस ठाण्यापासून सुरुवात करण्यात आली. त्यानंतर ठाणे शहरातील १२ पोलीस ठाण्यात तसेच ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात या ा डब्यांचे वाटप केल्याचे सांगण्यात आले.-----------
ठाण्यात पोलिसांना राष्ट्रीय बंजारा परिषदेतर्फे फराळाच्या ११०० डब्यांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 22:19 IST
गुन्हेगार आणि पोलीस यापलीकडे पोलीस आपले मित्र आहेत, ही भावना आणि हा संदेश समाजाला मिळण्यासाठी राष्ट्रीय बंजारा परिषद या संघटनेच्या वतीने दिवाळीत फराळ वाटपाचा अभिनव उपक्रम पोलिसांसाठी ठाण्यात राबविण्यात आला. पोलिसांची दिवाळी गोड व्हावी म्हणून कर्तव्यावर हजर असलेल्या पोलिसांना फराळाच्या डब्यांचे हे वाटप करण्यात आले.
ठाण्यात पोलिसांना राष्ट्रीय बंजारा परिषदेतर्फे फराळाच्या ११०० डब्यांचे वाटप
ठळक मुद्देकासारवडवली पोलीस ठाण्यातून प्रारंभसंघटनेचे जिल्हा अध्यक्ष संजय राठोड यांचा उपक्रमठाण्यातील १२ पोलीस ठाण्यांमध्ये केले वाटप