अपहरण करून ११ वर्षांच्या मुलाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 06:00 IST2018-07-18T06:00:20+5:302018-07-18T06:00:22+5:30

११ वर्षाच्या मुलाचे अपहरण करून गळा चिरून खून केल्याची घटना रविवारी उल्हासनगरात घडली.

11-year-old son murdered by kidnapping | अपहरण करून ११ वर्षांच्या मुलाचा खून

अपहरण करून ११ वर्षांच्या मुलाचा खून

उल्हासनगर : ११ वर्षाच्या मुलाचे अपहरण करून गळा चिरून खून केल्याची घटना रविवारी उल्हासनगरात घडली. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मानेरेगावात गणेश आल्हाट कुटूंबासह राहतो. कॅम्प नं-५ येथील जीन्स कारखान्यात तो पत्नीसह कामाला आहे. त्यांचा ११ वर्षाचा मुलगा हर्ष शाळा सुटल्यावर जीन्स कारखान्यात येत असे. रविवारी तेथे आलेला हर्ष सायंकाळी घरी जाताना अचानक गायब झाला. मुलगा घरी गेला असेल, अशी समजूत काढून गणेश पत्नीसह घरी गेला. मात्र मुलगा घरी दिसला नाही. मुलाची शोधाशोध सुरू केली असता मुलगा जयजनता कॉलनीतील एका खोलीत रक्ताच्या थारोळयात सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली.
जाकीर अन्सारी यांच्या भाडयाच्या खोलीत हर्षचा मृतदेह होता. शेजारीच चाकू होता. अन्सारी यांच्यासोबत १२ ते १५ तरूण भाडयाने राहत असल्याची माहिती हिललाईन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एम. के. खंदारे यांना मिळाली. त्यांनी अधिक चौकशी केली असता, सर्वच मुले गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आली. मुलाचे अपहरण करून खून केल्याचा गुन्हा पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.

Web Title: 11-year-old son murdered by kidnapping