कल्याणमध्ये ११ जणांनी केले रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:25 IST2021-07-05T04:25:08+5:302021-07-05T04:25:08+5:30

कल्याण : स्वातंत्र्यसंग्राम सेनानी तथा ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक स्वर्गीय जवाहरलाल दर्डा यांच्या जन्मदिनानिमित्त राज्यभरात राबवण्यात येत असलेल्या लोकमत ‘रक्ताचं नातं’ ...

11 people donated blood in Kalyan | कल्याणमध्ये ११ जणांनी केले रक्तदान

कल्याणमध्ये ११ जणांनी केले रक्तदान

कल्याण : स्वातंत्र्यसंग्राम सेनानी तथा ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक स्वर्गीय जवाहरलाल दर्डा यांच्या जन्मदिनानिमित्त राज्यभरात राबवण्यात येत असलेल्या लोकमत ‘रक्ताचं नातं’ या अंतर्गत रविवारी कल्याण पश्चिमेत रक्तदान शिबिर पार पडले. या शिबिरात ११ जणांनी रक्तदान केले.

कल्याण पश्चिमेतील महावीर जैन शाळेत हे रक्तदान शिबिर पार पडले. कमलेश शंकलेशा आणि राकेश मुथा यांनी या शाळेची जागा ‘लोकमत’च्या या उपक्रमास उपलब्ध करून दिली होती. रक्तदान शिबिरास भाजप शिक्षक सेलचे सहसंयोजक अनिल बोरनारे आणि आरएसपी कल्याण अधिकारी अनंत किणगे यांनी सर जे.जे. महानगर रक्तपेढीच्या जनसंपर्क अधिकारी प्रतिभा घोरपडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच ‘लोकमत’ने हाती घेतलेल्या आरोग्यदायी उपक्रमाचेही तोंडभरून कौतुक केले. सर जे. जे. महानगर रक्तपेढीचे डॉ. सचिन चौधरी, वैशाली वायदंडे, नर्स पूजा खर्डीकर, कांचन सरोदे-मोरे, वैशाली वायदंडे आणि मदतनीस असगर अली, ज्योतिराम जाधव आणि संकेत मोरे यांनी काम पाहिले.

... यांनी केले रक्तदान

दिनेश जाधव, कुंदा चंदने, मीनाश्री चंदने, संघसेन खोब्रागडे, राहुल जैन, आर्यन जैन, जिनेश जैन, ज्ञानेश्वर सपकाळे, रविकुमार घोलप, विशाल पिंपळे आणि प्रीती कोलते.

फोटो : ०४ कल्याण महावीर जैन शाळा रक्तदान

-------------------

Web Title: 11 people donated blood in Kalyan