शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

४०० खाटाच्या रुग्णालयासाठी ११ कोटीचे साहित्य, उल्हासनगर महापालिकेचे स्वतःचे रुग्णालय उभारण्याचे स्वप्न पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2021 16:28 IST

Ulhasnagar Municipal Corporation: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी उल्हासनगर महापालिका ४०० खाटाचे दोन रुग्णालय उभारणार असून रुग्णालय व लॅब साठी तब्बल ११ कोटीचे साहित्य खरेदी करणार आहे.

- सदानंद नाईक उल्हासनगर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी महापालिका ४०० खाटाचे दोन रुग्णालय उभारणार असून रुग्णालय व लॅब साठी तब्बल ११ कोटीचे साहित्य खरेदी करणार आहे. गुरवारी होणाऱ्या स्थायी समिती बैठकीत निविदा विना साहित्य खरेदीला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे, साहित्या मधील एका बेडशीटची किंमत ६०० तर पिलो ९०० रुपये दाखविल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. 

उल्हासनगर महापालिकेकडे स्वतःचे रुग्णालय नसल्याने कोविड-१९ महामारीच्या काळात महापालिकेने राज्य शासनाचे शासकीय प्रसूतीगृह रुग्णालयाचे रूपांतर कोविड रुग्णालयात केले. तसेच शांतीनगर येथे असलेले खाजगी साई प्लॅटिनियम रुग्णालय दरमहा २० लाख रुपये किमतीला भाडेतत्वावर घेतले. तसेच वैद्यकीय अधिकारी, नर्स, वॉर्डबॉयसह इतर कर्मचारी व औषधांचा पुरवठा केला. याशिवाय तहसिल कार्यालयाची नवीन इमारत, पालिकेची अभ्यासिका, शाळा, रेडक्रॉस हॉस्पिटल, टाटा आमंत्रण इमारत, वेदांत कॉलेज इमारत आदी अनेक इमारती कोविड रुग्णालयाच्या उपचारासाठी महापालिकेने घेतल्या होत्या, कालांतराने रुग्णसंख्या कमी झाल्याने, काही मालमत्ता महापालिकेने परत केल्या. दरम्यान महापालिकेने कोणार्क रेसिडेंसी येथे स्वतःची लॅब सुरू असून कर्मचारी व डॉक्टर ठेक्या पद्धतीने आहेत. 

रिजेन्सी अंटेलिया येथील बांधलेली जागा महापालिकेकडे हस्तांतरित झाल्यावर येथे २०० बेडचे स्वतःचे अद्यावत रुग्णालय सुरू करण्यास महापालिका प्रशासनाने मान्यता दिली. रिजेन्सी अंटेलिया शिवाय दुसरीकडे असेच एक २०० बेडचे रुग्णालय उभारण्याचा महापालिकेचा मानस आहे. अश्या ४०० बेड रुग्णालय व लॅब मधील साहित्य खरेदीसाठी तब्बल ११ कोटीचे साहित्य मागविण्यात येणार असून गुरवारी होणाऱ्या स्थायी समिती सभेत मंजुरी देण्यात येणार आहे. मात्र साहित्याच्या किंमतीत मोठी तफावत असून एका बेडशिटची किंमत ६०० तर पिलोची किमत ९०० रुपये दाखविण्यात आली. तसेच पिलो कव्हर १८० रुपये आहे. याशिवाय आयसीयूचा एका बेडची किंमत १ लाख ४० हजार दाखविण्यात आली असून इतर साहित्याच्या किंमतीत मोठी तफावत आहे. सर्व साहित्य विना निविदा मागविण्यात येणार आहे.

महापालिकेचे रुग्णालयाचे स्वप्न पूर्ण महापालिकेचे स्वतःचे रुग्णालय उभारण्याचे स्वप्न पूर्ण झाले असून स्थानिक नागरिकांना अद्यावत आरोग्य सुविधा मिळणार असल्याची प्रतिक्रिया महापौर लिलाबाई अशान, उपमहापौर भगवान भालेराव, स्थायी समिती सभापती टोनी सिरवानी यांनी दिली. रिजेन्सी अंटेलिया येथील रुग्णालयासह दुसरीकडे २०० खाटाचे रुग्णालय उभारण्यात येणार असून ४०० खाटाच्या रुग्णालय डोळ्या समोर ठेवून साहित्य मागविले आहे.४०० पैकी ६० खाटा आयसीयू असणार आहेत.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलulhasnagarउल्हासनगरHealthआरोग्यthaneठाणे