दहावीच्या परीक्षा सुरळीत सुरू
By Admin | Updated: March 2, 2016 01:32 IST2016-03-02T01:32:54+5:302016-03-02T01:32:54+5:30
जव्हार तालुक्यात भारती विद्यापीठ, दाभोसा व विनवळ अशा एकुण ३ केंद्रावर मंगळवारी दहावीच्या परीक्षा सुरू झालेल्या आहेत,

दहावीच्या परीक्षा सुरळीत सुरू
जव्हार :जव्हार तालुक्यात भारती विद्यापीठ, दाभोसा व विनवळ अशा एकुण ३ केंद्रावर मंगळवारी दहावीच्या परीक्षा सुरू झालेल्या आहेत, तीन्ही केंद्रे मिळून एकूण १६६९ विद्यार्थी होते त्यापैकी १६४३ विद्यार्थी परीक्षेस बसले असून परीक्षा सुरळीत सुरू झाली आहे.
नव्यानेच सुरू झालेल्या कस्तुरबागांधी शाळा, नवापाडा, विनवळ आश्रमशाळा, दाभोसा आश्रमशाळा अशा शाळेंचे विद्यार्थी तसेच रिपीटर विद्यार्थी मिळूण एकूण १६४३ विद्यार्थींनी परीक्षेत बसले होते. परीक्षेचे वेळापत्रक, बारकोड पद्धतीचा कसा वापर करावयाचा तसेच परीक्षेत गैरप्रकार करू नये अशा प्रकारचे पोस्टर शाळेच्या दर्शनिय भागात लावण्यात आले होते. तसेच कोणत्याही प्रकारचे कॉपीचे प्रकार होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांची गेटवरच झडती घेण्यात आली आणि गैरप्रकार केल्यास होणाऱ्या कारवाईच्या सूचना लावण्यात आल्या आहेत.