शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

१३१ शाळांचे १०० टक्के निकाल, ठाणे जिल्ह्यातील चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 01:22 IST

गेल्या वर्षी २६९ शाळा ठरल्या होत्या शंभर नंबरी

ठाणे : यंदा जिल्ह्याचा निकाल घसरल्याने १०० टक्के निकाल लागणाऱ्या शाळांमध्येही घट झाली आहे. ठाणे जिल्ह्यातील पाच तालुके व सहा महापालिकेतील सुमारे १३१ शाळांचा १०० टक्के निकाल लागला. गेल्यावर्षी २६९ शाळा शंभर नंबरी होत्या.

शंभर नंबरी निकाल लागलेल्या १३१ शाळांमध्ये कल्याण-डोंबिवली भागातील सर्वाधिक ४० शाळांचा समावेश आहे. यामध्ये डोंबिवलीतील चंद्रकात पाटकर विद्यालय, विद्यानिकेतन हायस्कूल, डॉन बॉस्को स्कूल, कल्याणातील गजानन विद्यालय, महावीर जैन इंग्लिश स्कूल, बालकमंदिर संस्था (इंग्रजी माध्यम), वाणी विद्यालय, के.सी. गांधी विद्यालय आदी शाळांचा समावेश आहे.त्यापाठोपाठ ठाणे महापालिका क्षेत्रातील २७ शाळांनी शंभर नंबरी यश प्राप्त केले असून त्यात ठाण्यातील संकल्प इंग्लिश स्कूल, होली क्र ॉस, सरस्वती एज्युकेशन हायस्कूल पाचपाखाडी, एन.के.टी. हायस्कूल, शिवनिकेतन यासारख्या शाळांचा, तर मीरा-भार्इंदर येथील ७, नवी मुंबईतील २० शाळांचा समावेश आहे. अपेक्षेपेक्षा कमी निकाल लागल्याची खंत अनेक शाळांनी व्यक्त केली.सरस्वती सेकंडरी स्कूलच्या ओमकारला ९७.६० टक्केसरस्वती सेकंडरी स्कूलचा निकाल ९७.८० टक्के लागला असून यात ओमकार नित्सुरे याने ९७.६० टक्के गुण मिळवून तो शाळेत प्रथम आला आहे. डॉ. बेडेकर विद्यामंदिरचा निकाल ९७.२० टक्के लागला असून यात रुद्र जेवळीकर या विद्यार्थ्याने ९४.२० टक्के मिळवून तो शाळेत प्रथम आला आहे. ग्रामीण विभागातील विद्या प्रसारक संस्थेचे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, ठाणे यांचा दहावीचा निकाल ९५.१९ टक्के लागला. यात आकांक्षा भोईर हिने प्रथम, प्रियंका पवार द्वितीय, हर्ष पाटील तृतीय तर प्रणय पानसरेने चतुर्थ क्रमांक पटकावला.संकल्प इंग्लिश स्कूलचा सलग आठव्या वर्षी १०० टक्के निकाल लागला असून यात स्नेहल वेलोंडे या विद्यार्थिनीने ९०.४० टक्के गुण संपादन केले आहे. संकेत विद्यालयाचा निकाल ८९.३४ टक्के लागला. यात ऋषिकेश नाफडे ९१.८० टक्के मिळवून प्रथम, विवेक चौधरी ९०.६० टक्के मिळवून द्वितीय, नयन गायकवाड ९० टक्के मिळवून तृतीय आला. मोरेकर गणित अभ्यासिकेचा निकाल १०० टक्के पूर्व चेंदणी कोळीवाड्यातील हरेश्वर मोरेकर विनाशुल्क गणित अभ्यासिकेचा निकाल यंदाच्या ५४ व्या वर्षीही १०० टक्के लागला. यावर्षी १० विद्यार्थ्यांनी या अभ्यासिकेचा लाभ घेतला.

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकालthaneठाणे