शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

 यूएलसीमुळे मिळालेली १००९ एकर जमिन शासनाने परवडणा-या घरांसाठी द्यावी - विश्वास उटगी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2017 16:30 IST

मुंबई, ठाणे, रायगड येथिल लाखो नागरिकांना तेथे जन्माला येऊनही व भूमीपुत्र असूनही हक्काचे घर मिळू शकत नाही. याबद्दल निवारा अभियान, मुंबई या संस्थेची एक सभा रविवारी डोंबिवलीत झाली. त्या सभेत मुंबई उच्च न्यायालयाच्या डिसेंबर २०१४ मधील निर्णयानुसार १००९ एकर जमीन सरकारने ताब्यात घेतली आहे.

डोंबिवली - मुंबई, ठाणे, रायगड येथिल लाखो नागरिकांना तेथे जन्माला येऊनही व भूमीपुत्र असूनही हक्काचे घर मिळू शकत नाही. याबद्दल निवारा अभियान, मुंबई या संस्थेची एक सभा रविवारी डोंबिवलीत झाली. त्या सभेत मुंबई उच्च न्यायालयाच्या डिसेंबर २०१४ मधील निर्णयानुसार १००९ एकर जमीन सरकारने ताब्यात घेतली आहे. कायद्यान्वये ही जागा मुंबईकरांना परवडणा-या घरांसाठी द्यायला हवी. त्यासाठी नागरिकांनी एकत्र यायला हवे असे आवाहन या चळवळीचे कार्याध्यक्ष विश्वास उटगी यांनी केले.डोंबिवलीत बोडस मंगल कार्यालयात झालेल्या सभेत ते उपस्थितांना मार्गदर्शन करत होते. निवारा अभियान, मुंबई सहकारी गृहनिर्माण संस्था उभारुन सरकारकडे जमिनीची मागणी करत आहे. सरकारी दराने हाऊसिंग सोसायट्यांना जागा मिळाल्यास कोणतेही मोठे बिल्डर न आणता, मुंबई,ठाणेकर आपली हाऊसिंग सोसायटी कमी किंमतीत उभी करु शकतात. आम्हाला आमच्या हक्काची जमिन द्या, मुंबई आमच्या हक्काची असून ती कॉर्पोरेट कंपन्यांच्या खिशात जाऊ देणार नाही असे आवाहन त्यांनी यावेळी केले. ५ आॅगस्ट पासून संस्थेने सुरु केलेल्या नोंदणी अभियानात आतापर्यंत सुमारे ३ हजार नागरिकांनी सदस्य नोंदणी केली आहे. केंद्रासह राज्याने परवडणा-या दरात घरे उपलब्ध करण्याची घोषणा केली. राज्याने तर ११ लाख घरे देण्याचा संकल्प सोडला, पण आता तर अडीच वर्षे झाली एकही घर बांधलेले नाही अशी टिका त्यांनी केली. यापूर्वी जनता दलाचे दिवंगत नेते बाबूराव सामंत, मृणाल गोरे यांच्या नेतृत्वाखाली नागरि निवारा परिषदेने गोरेगाव दिंडोशी येथे ६५०० हजार घरे बांधून स्वस्तात जमिन मिळवली होती. राज्य सरकारनेही माथाडी कामगारांना ५८ एकर जागा उपलब्ध करुन देत तेथे बांधकाम सुरु असून ८ लाख रुपयात ५०० फुटांचे घर मिळणार आहे. कमाल जमीन धारणा कायद्यांतर्गत ते शक्य होते. पण जागतिक बँक, कें्रद्र सरकार आणि जमीन मालकांच्या दबावाखाली येत आधीच्या सरकारने तो कायदाच रद्द करुन टाकला. पण तरीही त्या दरम्यान ताब्यात घेतलेली १००९ एकरची जागा घरांसाठी उपलब्ध करुन द्यावीच लागेल अशी भूमिका या चळवळीची असून नागरिकांनी त्याला सहकार्य करावे असे आवाहन उटगी यांनी डोंबिवलीकरांना केले. त्यावेळी व्यासपीठावर काळू कोमास्कर, अरुण वेळासकर, महेश बनसोडे आदींसह मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :Homeघर