उल्हासनगरात बांधकाम व्यावसायिकांची १० लाख ४५ हजाराची ऑनलाईन फसवणुक
By सदानंद नाईक | Updated: January 19, 2024 18:28 IST2024-01-19T18:28:28+5:302024-01-19T18:28:42+5:30
कॅम्प नं-५, गांधी रस्ता परिसरात राहणाऱ्या एका बांधकाम व्यावसायिकाची मोबाईल फोनवर विमा पॉलिसी प्रीमियम भरण्यास भाग पडून १० लाख ४५ हजाराची फसवणूक केली.

उल्हासनगरात बांधकाम व्यावसायिकांची १० लाख ४५ हजाराची ऑनलाईन फसवणुक
सदानंद नाईक
उल्हासनगर : कॅम्प नं-५, गांधी रस्ता परिसरात राहणाऱ्या एका बांधकाम व्यावसायिकाची मोबाईल फोनवर विमा पॉलिसी प्रीमियम भरण्यास भाग पडून १० लाख ४५ हजाराची फसवणूक केली. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
उल्हासनगर कॅम्प नं-५ गांधी रोड परिसरात रामकिशोर खुबचंदानी राहत असून व्यवसायाने बांधकाम व्यावसायिक आहेत. ५ ऑक्टोबर २०२३ व १ डिसेंबर २०२३ रोजी त्यांच्या मोबाईल फोनवर एक कॉल येऊन, पीएनबी मेट लाईफ या इन्शुरन्स कंपनीकडून बोलत असल्याचे बोलत असलेल्या इसमाने सांगितले.
त्यांने दोन इन्शुरन्सचे हप्ते बाकी असल्याचे खूबचंदानी यानासांगून विमा पॉलिसीचे हप्ते बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेतील एका खात्यात भरण्यास सांगितले. खुबचंदानी यांनी १० लाख ४५ हजाराचे इन्शुरन्स प्रीमियर भरला. मात्र त्यानंतर आपली ऑनलाईन फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी हिललाईन पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करीत आहे.