शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

मद्यपी वाहनचालकाला १० दिवसांचा कारावास!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2021 02:53 IST

३१ डिसेंबरच्या रात्री मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणाऱ्यांचे प्रमाण जास्त असते

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मद्यधुंद अवस्थेत ३१ डिसेंबरला वाहन चालविताना ठाणे वाहतूक पोलिसांनी विटावा नाका येथे पकडलेल्या एका वाहनचालकासह सहप्रवाशाला ठाणे न्यायालयाने सात दिवसांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. न्यायालयाने या दोघांना सुरुवातीला १० हजार रुपये दंड ठोठावला होता. मात्र, ही रक्कम भरता न आल्याने त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली. कळवा वाहतूक शाखेने त्या दिवशी पकडलेल्या उर्वरित २६ जणांना प्रत्येकी १० हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. 

३१ डिसेंबरच्या रात्री मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणाऱ्यांचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे होणारे संभाव्य अपघात टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी करून वाहनचालकांची तपासणी केली होती. त्या रात्री ४१६ मद्यपी वाहनचालक आणि २०७ सहप्रवाशांवर पोलिसांनी कारवाई केली. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास विटावा चौकी येथे बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलीस पथकाने एका मोटारसायकलस्वाराला रोखले होते. त्या चालकासह त्याच्यासोबतचा सहप्रवासी मद्यधुंद अवस्थेत असल्याचे तपासणीत निष्पन्न झाले. पोलिसांनी मोटार वाहन कायद्याचे कलम १८५ आणि १८८ अन्वये या दोघांवर कारवाई केली. न्यायालयाने त्यांना प्रत्येकी १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली होती. परंतु, दंडाची ही रक्कम दोघांनीही भरली नाही. 

मोटार वाहन कायद्याचे कलम १८५ आणि १८८ अन्वये मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणे किंवा अशा चालकासोबत प्रवास करणे यासाठी किमान दोन हजार रुपये दंड किंवा सहा महिने कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे. परंतु, ३१ डिसेंबरच्या रात्री कळवा वाहतूक शाखेने पकडलेल्या १७ वाहनचालक आणि सात सहप्रवाशांना न्यायालयाने प्रत्येकी १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली होती. 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी