शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

10 बसेसचं ॲम्ब्युलन्समध्ये रूपांतरण, प्रत्येकात ब्रदर आणि अटेंडन्टची नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2020 20:25 IST

कोरोनाच्या विरूद्ध लढण्यासाठी ठामपा सरसावली

ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रात कोरोना कोव्हीड 19 रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेवून महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी चक्क टीएमटीच्या बसेस ॲम्ब्युलन्समध्ये रूपांतरित करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला असून रविवारी संध्याकाळ पर्यंत पाच बस ॲम्ब्युलन्स कोरोना विरूद्धच्या लढाईत सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे या सर्व बसेसमध्ये तीन पाळ्यामध्ये ब्रदर्स आणि अटेडंटची नियुक्ती करण्यात आली आहे.पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या सुचनेच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे.            कोरोनाविरूद्धचा लढा अधिक तीव्र करताना त्यासाठी लागणाऱ्या सुविधांची वानवा भासू नये या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त सिंघल यांनी हा निर्णय घेतला असून ठाणे परिवहनच्या दहा बसेस आता ॲम्ब्युलन्स म्हणून वापरण्यात येणार आहेत. एका बसमध्ये दोन बेडस् बसविण्यात आले असून ड्रायव्हरच्या केबिनपासून ॲम्ब्युलन्सचा भाग पार्टीशनच्या साहाय्याने पूर्णतः स्वतंत्र ठेवण्यात आला आहे. सदरच्या बस ॲम्ब्युलन्स तीन पाळ्यांमध्ये चालविण्यात येणार असून या प्रत्येक बसेमध्ये प्रत्येक पाळीमध्ये एक ब्रदर आणि एक अटेडंट नियुक्त करण्यात आले आहेत. यातील पहिल्या पाच बस ॲम्ब्युलन्स आज सायंकाळपासून सेवेत रूजू होत असून उर्वरित 5 बसेस उद्या सायंकाळपर्यंत पूर्ण क्षमतेने चालणार आहेत. ठाणे महानगरपालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे याचे नियंत्रण ठेवण्यात आले असून या सेवेसाठी 022-25399828 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या