देशातील 10 पक्षी अधिवासांना धोका!
By Admin | Updated: November 16, 2014 01:09 IST2014-11-16T01:09:12+5:302014-11-16T01:09:12+5:30
बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने नुकतेच केलेल्या एका अभ्यासांती देशातील 1क् पक्षी अधिवासांना धोका असल्याचे नमूद केले आहे.

देशातील 10 पक्षी अधिवासांना धोका!
मुंबई : गेल्या अनेक वर्षापासून राबविण्यात येणारी अशाश्वत विकासाची धोरणो, पर्यावरणाचा होणारा विनाश, जंगलांमध्ये मनुष्याचे होणारे अतिक्रमण अशा अनेक घटकांमुळे पक्षी वास्तव्य करीत असलेल्या ठिकाणांना हानी पोहोचत असून, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने नुकतेच केलेल्या एका अभ्यासांती देशातील 1क् पक्षी अधिवासांना धोका असल्याचे नमूद केले आहे. म्हत्त्वाचे म्हणजे धोका असलेल्या या 1क् अधिवासांमध्ये महाराष्ट्रातील दोन क्षेत्रंचा समावेश आहे.
बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी ही संस्था पर्यावरणासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असून, सध्या यूकेस्थित बर्डलाइफ इंटरनॅशनल-अ ग्लोबल कन्र्झव्हेशन ऑर्गनायङोशनसोबत संस्थेचे कार्य सुरू आहे. या कार्याच्या माध्यमातून दोन्ही संस्थांनी ‘इम्पॉर्टन्ट बर्ड अॅन्ड बायोडायव्हर्सिटी एरियाज : अ ग्लोबल नेटवर्क फॉर कन्झवर्ि्हग नेचर अॅन्ड बेनिफिटिंग पीपल’ या मथळ्याखाली नुकताच एक अहवाल सादर केला आहे.
गुजरातमधील फ्लेमिंगो सिटी म्हणून ओळख असलेले कच्छ, सोलापूर-अहमदनगरमधील ग्रेट इंडियन बस्टर्ड सँक्च्युरी, मुंबईतील शिवडी-माहूल खाडी, मध्य प्रदेशमधील सैलाना खरमोर सँक्च्युरी, अंदमान-निकोबारमधील तिलंगचोंग, मध्य प्रदेशमधील दिहालिया झील, मध्य प्रदेश येथील करेरा वाइल्ड लाइफ सँक्च्युरी, हरियाण येथील बसई, मध्य प्रदेश येथील सरदारपूर फ्लोरिकन सँक्च्युरी आणि कर्नाटकमधील रने बेन्नूर हे पक्ष्यांचे 1क् अधिवास अहवालात धोक्यात असल्याचे नमूद करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
च्अशास्वत विकास, बांधकामांचा अतिरेक, चुकीच्या पद्धतीने राबविण्यात आलेली धोरणो, औद्योगिक प्रदूषण, शहरीकरण अशा अनेक कारणांमुळे पक्ष्यांचे अधिवास धोक्यात आल्याचे बीएनएचएसचे प्रकल्प व्यवस्थापक डॉ. राजू कसंबे यांनी सांगितले.
च्शिवाय सरकारकडून पक्ष्यांचे अधिवास सुरक्षित राहावेत, म्हणून अपेक्षित सहकार्य होत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. तर दुसरीकडे 122 देशांतील पक्ष्यांच्या 12 हजार अधिवासांपैकी 356 अधिवासांनाही धोका असल्याची माहिती बीएनएचएसच्या संवाद विभागाचे व्यवस्थापक अतुल साठे यांनी दिली.