शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
2
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
3
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
4
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
5
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
6
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
7
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
8
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
9
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
10
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
11
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
12
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
13
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
14
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
15
Health Tips: शरीरावर असलेले लाल मोस कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
16
Plane Crash: उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमान कोसळलं; भयानक घटना कॅमेऱ्यात कैद!
17
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
18
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
19
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
20
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका

ठाणे महापालिका हद्दीत १ हजारांचा आकडा पार, कोविड जिल्हा रुग्णालयात तिसरी प्रसूती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2020 20:14 IST

ठामपा कार्यक्षेत्रात शनिवारी सर्वाधिक 94 नवीन रुग्ण आढळून आल्याने तेथील रुग्ण एक हजार 90 इतकी झाली आहे. त्या खालोखाल नवीमुंबईत 80 रुग्णांची नोंदणी झाल्याने एकूण रुग्ण संख्या एक हजार 128 वर पोहोचली आहे

ठाणे - जिल्ह्यात शनिवारी सर्वाधिक 289 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाल्याने जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या तीन हजार 432 झाली आहे. तर आज आणखी 5 जण दगावले आहेत. सर्वात जास्त 94 रुग्ण हे ठाणे महापालिका हद्दीत नोंदवल्याने ठामपाने नवीमुंबई पाठोपाठ एक हजारांचा टप्पा पार केला आहे. त्याचबरोबर मिराभाईंदरने तिनशेचा आणि उल्हासनगरने शंभराचा आकडा गाठला आहे. तर नवीमुंबई 80 रुग्ण मिळून आले असून तेथे तिघांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर सर्वात कमी एका रुग्णाची नोंद ही अंबरनाथ येथे झाली आहे. दुसरीकडे ठाणे जिल्हा कोविड रुग्णालयात पॉझिटिव्ह म्हणून दाखल झालेल्या गर्भवती महिलेची प्रसूती करण्यात डॉक्टरांना यश आले आहे. तर बाळ बाळंतिण हे सुखरूप असल्याची माहिती ठाणे जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली.       ठामपा कार्यक्षेत्रात शनिवारी सर्वाधिक 94 नवीन रुग्ण आढळून आल्याने तेथील रुग्ण एक हजार 90 इतकी झाली आहे. त्या खालोखाल नवीमुंबईत 80 रुग्णांची नोंदणी झाल्याने एकूण रुग्ण संख्या एक हजार 128 वर पोहोचली आहे. त्यातच आज तिघांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 26 झाला आहे.कल्याण डोंबिवलीत 35 नवे रुग्णांची नोंद झाल्याने रुग्ण संख्या 459 वर गेली आहे. तसेच एकाचा मृत्यू ही झाल्याने मृतांचा आकडा 10 झाला आहे. ठाणे ग्रामीणमध्ये 24 रुग्ण सापडल्याने तेथील रुग्ण 165 झाली आहे. 21 नवे रुग्ण हे मिराभाईंदर येथे आढळून आल्याने एकूण रुग्ण संख्या 312 झाली असून तेथे एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा 9 झाला आहे. बदलापूरला 19 रुग्ण मिळून आल्याने रुग्ण संख्या 98 वर गेली आहे. उल्हासनगर येथे 12 नवे रुग्ण निदान झाल्याने रुग्ण संख्या 106 इतकी झाली आहे. भिवंडीत 5 जण सापडल्याने तेथील रुग्ण संख्या 41 झाली आहे. सर्वात कमी 1 रुग्ण हा अंबरनाथमध्ये मिळाल्याने तेथील रुग्ण 33 झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

पुन्हा ठाण्याच्या कोविड रुग्णालयात डिलिव्हरीशनिवारी ठाण्यात राहणाऱ्या 25 वर्षीय कोविड पॉझिटिव्ह गर्भवती महिलेने तीन किलो वजनाच्या बाळा जन्म दिला आहे. ही जिल्ह्यातील तिसरी डिलिव्हरी असून त्या महिलेला 14 मे रोजी उपचारार्थ दाखल केले होते. तिची जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलाश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. स्वाती पाटील यांनी ही डिलिव्हरी केली.ते मायलेक सुखरूप असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. 

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या