शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

मीरारोडमध्ये एक कोटीचा गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 20:47 IST

सर्व्हिस मार्गावर गुटख्याने भरलेल्या ५ बोलेरो पिकअप व्हॅन उभ्या असल्याचे त्यांना खबऱ्याने सांगितले.

मीरारोड - मीरारोड मध्ये रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या ५ वाहनांमधून तब्बल १ कोटी रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आलाय. ठाणे ग्रामीण पोलीसांनी केलेल्या या कारवाईत गुटख्या सह ५ वाहनं जप्त केली आहेत.राज्यात बंदी असली तरी गुजरात भागातुन चोरट्या मार्गाने गुटखा आणला जातो. काशिमीरा हद्दीतुन गुटखा मुंबईला पुरवला जातो. तर या आधी काशिमीरा भागात गुटखा साठ्याची गोदामं सुध्दा सापडली होती. मीरारोड मध्ये तर गुटखा बनवुन पॅकिंगचा कारखानाच एका सदनिकेतुन चालत असल्याचे उघड झाले होते. त्यामुळे शहरात गुटख्याची चोरटी वाहतुक , साठा रोखण्यासाठी पोलीस अधिक्षक डॉ. महेश पाटील यांनी स्थानिक पोलीसांना वेळोवेळी कारवाईचे आदेश दिले होते.सहाय्यक पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांना सोमवारी मध्यरात्री नंतर गुटख्याच्या साठ्याची माहिती मिळाली. प्लेझेंट पार्कच्या भारती टॉवर, डॉन बॉस्को शाळेसमोरच्या सर्व्हिस मार्गावर गुटख्याने भरलेल्या ५ बोलेरो पिकअप व्हॅन उभ्या असल्याचे त्यांना  खबऱ्याने सांगितले.कुलकर्णी यांनी डॉ. पाटील व अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत कदम यांच्या मार्गदर्शना खाली आपल्या पथकासह काशिमीरा पोलीसांना सोबत घेऊन त्या पाच ही मालवाहु गाड्या ताब्यात घेतल्या. गाडीचे चालक वगेरे कोणच नव्हते. गाड्यांची टाळी उघडली असता गुटख्याचा मोठा साठा आढळुन आला. चार गाड्यांमध्ये गोवा गुटखा तर एका गाडीत वजीर गुटख्याचा साठा सापडला.तब्बल ३६८ गोणी भरुन हा गुटख्याचा साठा असुन त्याची बाजारातली किंमत ९९ लाख ६६ हजार ७५० रुपये इतकी आहे. गाडीचे चालक आदी कोणीच सापडले नसल्याने गुटखा आणला कुठुन व कोणी हे तपासा नंतरच सांगता येईल. सध्यातरी गुटख्याचा साठा हा अन्न व औषध प्रशासनाच्याअन्न अन्न सुरक्षा अधिकारी डि.झेड. तोत्रे यांच्याकडे पुढील कार्यवाही साठी सुपूर्द केला आहे, असे सहाय्यक पोलीस निरीक्षक देवीदास हांडोरे यांनी सांगीतले.

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिस