शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी दुर्घटना! गेरुआ नदीत गावकऱ्यांना घेऊन जाणारी बोट उलटली; १३ जणांना वाचवलं, ८ बेपत्ता
2
Cyclone Montha : मोंथाचा विध्वंस! २.१४ लाख एकर पिकं उद्ध्वस्त, १८ लाख लोकांना फटका, रेल्वे स्टेशन पाण्याखाली
3
भयंकर! हिट अँड रननंतर कारने बाईकस्वाराला १.५ किमी फरफटतं नेलं; धडकी भरवणारा Video
4
आजचे राशीभविष्य, ३० ऑक्टोबर २०२५: सरकारी मदत, आर्थिक लाभ; जुने मित्र भेटतील, आनंदी दिवस
5
'साईबाबा' फेम अभिनेते सुधीर दळवींना मदत केल्याने रणबीर कपूरची बहीण झाली ट्रोल, नेमकं काय घडलं?
6
"खरं सांगायचं तर..."; फिल्मफेअर पुरस्कार विकत घेतल्याच्या आरोपांवर अभिषेक बच्चन स्पष्टच म्हणाला
7
पती झाला हैवान! लेकासमोरच पत्नीची निर्घृण हत्या, डोळ्यांना, चेहऱ्याला...; अपघाताचा रचला बनाव
8
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
9
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
10
वेतन वाढेल, जबाबदारी? आठव्या वेतन आयोगाने सरकारवरील बोजा २० ते २५ हजार कोटींनी वाढणार
11
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध
12
५ नोव्हेंबरपर्यंत पाऊसधारांचा अंदाज; कमी दाबाचा पट्टा ओमानकडे जाण्याऐवजी किनारपट्ट्यांवर रेंगाळला
13
सावध व्हा, ‘कॉल मर्जिंग स्कॅम’ धाेका ! नव्या पद्धतीने केवळ काही अवधीत लाखो रुपयांवर डल्ला
14
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
15
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
16
काँग्रेसमध्ये महापालिकेसाठी इच्छुकांची गर्दी; आले ४५० अर्ज, इच्छुकांकडून ५०० रुपये शुल्क
17
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
18
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
19
सेंट जॉर्जेस रुग्णालयातील मृत्यूदर का वाढला? दाखल रुग्णांपैकी २४ ते २५ टक्के जण दगावतात
20
अर्बन कंपनी सर्च केले आणि ऑनलाइन मेड मागविली; महिलेचे खातेच झाले रिकामे

Wimbledon Final 2021: महिला बिग बॅश लीगमधील क्रिकेटपटू खेळणार आज विम्बल्डन फायनल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2021 18:19 IST

Wimbledon Final 2021: ऑस्ट्रेलियाची अॅश बार्टी आणि झेक प्रजासत्ताकची कॅरोलिना प्लिस्कोव्हा यांच्यात विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील महिला गटाची फायनल होणार आहे.

Wimbledon Final 2021: ऑस्ट्रेलियाची अॅश बार्टी आणि झेक प्रजासत्ताकची कॅरोलिना प्लिस्कोव्हा यांच्यात विम्बल्डनटेनिस स्पर्धेतील महिला गटाची फायनल होणार आहे. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेली बार्टी प्रथमच विम्बल्डन फायनल खेळत आहे आणि तिनं २०१९मध्ये फ्रेंच ओपन स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. टॉप क्लास टेनिसपटू असलेली २५ वर्षीय बार्टी ही महिला बिग बॅश लीगमध्ये ( WBBL 2015) खेळली आहे, हे ऐकल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल. 

२०१३ साली तिनं विम्बल्डन स्पर्धेतून व्यावयसायिक टेनिस खेळण्यास सुरुवात केली होती, परंतु २०१४ मध्ये तिनं क्रिकेट खेळण्यासाठी टेनिसमधून ब्रेक घेण्याचा निर्णय़ घेतला. तेव्हा ती १९ वर्षांची होती आणि ब्रिस्बन हिट संघाचे प्रतिनिधित्व करताना तिनं ९ सामन्यांत ११.३३च्या सरासरीनं ६८ धावा केल्या होत्या. ब्रिस्बन हिट संघाकडून खेळण्यापूर्वी तिनं वेस्टर्न सबर्ब डिस्ट्रीक्ट क्रिकेट क्लबचे प्रतिनिधित्व केले होते. विम्बल्डनच्या अंतिम सामन्यापूर्वी ब्रिस्बन हिट संघानं तिला शुभेच्छा दिल्या आहेत.  अॅश बार्टीची विम्बल्डन २०२१ मधील कामगिरी

  • पहिली फेरी - वि. वि. कार्ला सुआरेझ नाव्हारो ( स्पेन) ६-१, ६-७ (१), ६-१ 
  • दुसरी फेरी - वि. वि. अॅना ब्लिंकोव्हा ( रशिया) ६-४, ६-३
  • तिसरी फेरी - वि. वि. कॅटरीन सिनिआकोव्हा ( झेक प्रजासत्ताक) ६-३, ७-५
  • चौथी फेरी - वि. वि. बार्बोरा क्रेझसिकोव्हा ( झेक प्रजासत्ताक) ७-५, ६-३
  • उपांत्यपूर्व फेरी - वि. वि. अल्जा टॉम्लीजानोव्हिच ( ऑस्ट्रेलिया) ६-१, ६-३
  • उपांत्य फेरी - वि. वि. अँजेलिक कर्बर ( जर्मनी) ६-३, ७-६ ( ३)   
टॅग्स :Wimbledonविम्बल्डनBig Bash Leagueबिग बॅश लीगTennisटेनिसAustraliaआॅस्ट्रेलिया