शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
5
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
6
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
7
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
8
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
9
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
10
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
11
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
12
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
13
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
14
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
15
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
16
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
17
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
18
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

Wimbledon 2018 : फेडरर हरल्यावर इंग्लंडमध्ये फुटले फटाके; कारण वाचून कपाळावर हात माराल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2018 14:32 IST

विम्बल्डन टेनिस स्पर्धेत बुधवारी गतविजेत्या रॉजर फेडररला उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा धक्का बसला आणि त्याच्या चाहत्यांमध्ये शोकाकुल वातावरण पसरले. मात्र इंग्लंडच्या फुटबॉल चाहत्यांनी फेडररच्या पराभवाचा जल्लोष केला.

लंडन - विम्बल्डन टेनिस स्पर्धेत बुधवारी गतविजेत्या रॉजर  फेडररला उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा धक्का बसला आणि त्याच्या चाहत्यांमध्ये शोकाकुल वातावरण पसरले. मात्र इंग्लंडच्या फुटबॉल चाहत्यांनी फेडररच्या पराभवाचा जल्लोष केला. दक्षिण आफ्रिकेच्या केव्हिन अँडरसनने पाच सेटमध्ये रंगलेल्या चुरशीच्या लढतीत फेडररला पराभूत करताना प्रथमच विम्बल्डनच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. १९८३ साली केव्हिन कुरेन यांनी विम्बल्डनची उपांत्य फेरी गाठली होती आणि त्यानंतर अशी कामगिरी कराणारा अँडरसन हा आफ्रिकेचा पहिलाच खेळाडू ठरला. त्याच्या विजयाचा जल्लोष दूर आफ्रिकेत तर झालाच शिवाय इंग्लंडमध्येही आतषबाजी करून फेडररच्या पराभवाचा आनंद साजरा कराण्यात आला. फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडचा संघ सातत्यपूर्ण कामगिरी करत असताना जेतेपद आपलेच या आविर्भावात त्यांचे पाठीराखे होते. त्यात फेडररचा पराभव म्हणजे इंग्लंडचे जेतेपद निश्चित या गोड गैरसमजाने त्यांच्या मनात घर केले. इंग्लंडने १९६६ ला विश्वचषक उंचावला होता आणि त्यानंतर तब्बल ५२ वर्षांनी त्यांना हा सुवर्णक्षण पुन्हा अनुभवण्याची संधी वाटली. १९६६ च्या विम्बल्डन स्पर्धेत गतविजेत्या (१९६५) रॉय इमर्सन यांना उपांत्यपूर्व फेरीतच गाशा गुंडाळावा लागला होता आणि त्याच वर्षी इंग्लंडने जेतेपद जिंकले होते.हाच धागा पकडून यंदाही इंग्लंड बाजी मारेल अशी चाहत्यांची धारणा झाली होती. त्यामुळे फेडररचा पराभव म्हणजे विश्वचषक आपलाच, या उत्साहात त्यांनी फटाके फोडले. पण इतिहासाच्या कुबड्या घेऊन स्वप्नरंजन करण्यापेक्षा वास्तव्यात जगणे कधीही चांगले. क्रोएशियाविरूध्द अत्यंत ढिसाळ खेळ करणाऱ्या इंग्लंडला उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला आणि फेडररच्या पराभवावर नाचणारे पाय जणू जखडून गेले. यावेळी इतिहास इंग्लंडच्या बाजूने उभा राहिला नाही आणि फेडररचा पराभव त्यांच्यासाठी अनलकी ठरला. 

टॅग्स :Wimbledonविम्बल्डनRoger fedrerरॉजर फेडररTennisटेनिसSportsक्रीडा