शहरं
Join us  
Trending Stories
1
"अफगाणिस्तानकडून राष्ट्रप्रेमाचे धडे घ्या": पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार, चतुर्वेदींचा BCCI-सरकारला टोला
2
डॉक्टर जावयाने स्किन स्पेशलिस्ट लेकीला संपवलं; वडिलांचा मोठा निर्णय, ३ कोटीचं घर केलं दान
3
Video - अग्निकल्लोळ! गरीब रथ एक्स्प्रेसला भीषण आग; डबा जळून खाक, प्रवाशांना वाचवण्यात यश
4
मनसेला सोबत घेण्याचा प्रस्ताव दिलेलाच नाही! राऊतांचा काँग्रेसवर निशाणा, म्हणाले, "अजून ते स्वातंत्र्य चळवळीच्या काळातच"
5
धनत्रयोदशीला सोनं खरेदी करणं फायदेशीर ठरेल का, तेजी कायम राहिल? तज्ज्ञांचं म्हणणं काय?
6
७.५ कोटी कॅश, २.५ किलो सोनं, मर्सिडीज... 'भ्रष्ट' IPS अधिकाऱ्याकडे सापडलं कोट्यवधींचं घबाड
7
‘राजद’ने शरद यादव यांच्या मुलाला तिकीट दिले अन् परत काढूनही घेतले, काँग्रेसनेही दिग्गज नेत्यांच्या मुलांना तिकीट नाकारले 
8
काहीतरी मोठं घडणारे... सोन्याच्या किमतीतील तेजीमुळे ही कसली भीती? दिग्गज अर्थतज्ज्ञानं दिला इशारा
9
काय सत्य अन् काय स्वप्न! गूढ वाढवणारा 'असंभव' सिनेमाचा टीझर पाहिलात का?
10
'ट्रेनमध्ये टाईम बॉम्ब लावलाय...', ऐकताच प्रवाशांमध्ये उडाली खळबळ; पोलिसांनी तपास करताच समोर आलं भलतंच कांड!
11
"महायुतीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल; तोपर्यंत सर्वांनी सबुरीने घ्या!"
12
Pakistan-Afghanistan War : युद्धविराम होऊनही पाकिस्तानकडून पक्तिका प्रांतात हल्ला; ३ अफगाण क्रिकेटपटू ठार
13
पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी ओकली गरळ; अफगाणिस्तान भारताच्या हातात म्हणत संबंध तोडण्याची घोषणा!
14
'दंगल' फेम अभिनेत्री जायरा वसीमचा झाला निकाह, ६ वर्षांपूर्वीच धर्मासाठी सोडली ग्लॅमरची दुनिया
15
समीर वानखेडेप्रकरणी न्यायालयाचे केंद्रावर ताशेरे
16
रोहिणी हट्टंगडी साकारणार पूर्णा आजींची भूमिका; ज्योती चांदेकरांबद्दल म्हणाल्या, "तिच्यासोबत मी..."
17
रबाळेत सुगंधी उत्पादनांचा कारखाना आगीत खाक, ७० कामगार बचावले
18
शेतकऱ्यांना आशेचा किरण : राज्यात २१ लाख शेतकऱ्यांना होणार १,३५६ कोटी वाटप
19
अमेरिकेच्या व्हाइट हाऊसमध्ये ट्रम्प-जेलेंस्कींची भेट; युक्रेन युद्धाच्या समाप्तीसाठी 'मोमेंटम'वर चर्चा! पण ठेवली 'ही' अट 
20
नितीशकुमार यांनी राज्य जंगलराजमधून मुक्त केले, अमित शाह यांचे उद्गार, रालोआचाच विजय होणार 

ऑस्ट्रेलियन ओपन, प्लिस्कोवाचा सेरेना विल्यम्सवर विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2019 04:10 IST

सेरेना विल्यम्सला बुधवारी ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये पराभवाचा धक्का बसला.

मेलबर्न : सेरेना विल्यम्सला बुधवारी ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये पराभवाचा धक्का बसला. त्यासोबतच सेरेनाला २४वे ग्रॅण्डस्लॅम जिंकून विक्रम करण्यासाठी आणखी काही काळ वाट बघावी लागणार आहे. तिला कॅरोलिना प्लिस्कोवा हिने पराभूत केल,े तर पुरुष एकेरीत नोवाक जोकोविच उपांत्य फेरीत पोहोचला आहे.अमेरिकन दिग्गज खेळाडू सेरेना हिने चौथ्या फेरीत सिमोना हालेप हिला पराभूत केले होते. मात्र, चेक प्रजासत्ताकच्या सातव्या मानांकित प्लिस्कोवा विरोधात संघर्षपूर्ण सामन्यात तिला ६-४, ४-६, ७-५ असा पराभव पत्करावा लागला. सेरेनाला तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये चार मॅच पॉर्इंट मिळाले होते. मात्र, प्लिस्कोवाने सर्व पॉर्इंट वाचवत अखेर उपांत्य फेरीत प्रवेश केला.प्लिस्कोवा हिला अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी जपानच्या नाओमी ओसाका विरोधात लढावे लागेल. चौथ्या मानांकन प्राप्त ओसाका हिने दुखापतग्रस्त इलिना स्वेतलाना हिला ६-४, ६-१ असे पराभूत केले.विश्व नंबर वन जोकोविच याला उपांत्यपूर्व फेरीत जास्त मेहनत घ्यावी लागली नाही. दुखापतीमुळे केई निशिकोरी याने सामन्यातून माघार घेतली. विक्रमी सातव्या आॅस्ट्रेलियन ओपन विजेतेपद पटकाविण्यासाठी उत्सुक असलेल्या जोकोविच याला उपांत्य फेरीत फ्रान्सच्या लुकास पोऊलीविरोधात खेळावे लागेल. त्याने मिलोस राओनिकला पराभूत केले. पोऊली पहिल्यांदाच कोणत्याही ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचला आहे. प्लिसकोवा तिसºयांदा ग्रॅण्डस्लॅमच्या उपांत्य फेरीत पोहोचली आहे. ती २०१७मध्ये फ्रेंच ओपन आणि गेल्या वर्षी अमेरिकन ओपनच्या अंतिम चारमध्ये पोहोचली होती.सेरेनाचा हा पराभव निराशाजनक होता. कारण ती एकवेळ तिसºया सेटमध्ये ५-१ अशी पुढे होती आणि सर्व्हिसही तिच्याकडेच होती. मात्र, काही चुकीच्या शॉटमुळे तिचा पराभव झाला. सेरेना म्हणाली की, ‘मी मॅच पॉर्इंटवर चुका केल्या. मी आक्रमक खेळ करीत होते, तर तिने योग्य शॉट लगावले.’ दुसरीकडे ओसाका ही किमीको डेटनंतर आॅस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्य फेरीत पोहोचणारी पहिली जपानी खेळाडू बनली आहे. ती अमेरिकन ओपननंतर सलग दुसºयांदा ग्रॅण्डस्लॅमच्या उपांत्य फेरीत पोहोचली आहे.

टॅग्स :serena williamsसेरेना विल्यम्स