शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

यूएस ओपन : व्हीनस, राडुकानू, ओसाका सलामीला पराभूत,  सॅम क्वेरीचा टेनिसला अलविदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2022 11:23 IST

US Open 2022: दिग्गज टेनिसपटू व्हीनस विलियम्सला यूएस ओपन टेनिस स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा पहिल्या फेरीत पराभवाचा सामना करावा लागला.  महिला एकेरीत सध्याची विजेती एम्मा राडुकानू आणि माजी विजेती जपानची नाओमी ओसाका यांचे आव्हानदेखील पहिल्या फेरीत संपुष्टात आले. 

न्यूयॉर्क : दिग्गज टेनिसपटू व्हीनस विलियम्सला यूएस ओपन टेनिस स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा पहिल्या फेरीत पराभवाचा सामना करावा लागला.  महिला एकेरीत सध्याची विजेती एम्मा राडुकानू आणि माजी विजेती जपानची नाओमी ओसाका यांचे आव्हानदेखील पहिल्या फेरीत संपुष्टात आले. जूनमध्ये ४२वा वाढदिवस साजरा करणाऱ्या सातवेळेची ग्रॅण्डस्लॅम चॅम्पियन व्हीनसला एलिसन उयतवांकने  ६-१, ७-६ ने पराभूत केले. दरम्यान, राडुकानू ही पहिल्या फेरीत बाहेर पडणारी तिसरी यूएस चॅम्पियन ठरली. तिला एलिजे कॉर्नेटने ६-३, ६-३ने पराभूत केले. राडुकानू मागच्या वर्षी पात्रता फेरीचा अडथळा पार करून मुख्य स्पर्धेत सहभागी झाली शिवाय चॅम्पियन बनली होती.

यूएस ओपन दोनदा जिंकणारी ओसाकादेखील सरळ सेटमध्ये  ऑस्ट्रेलियन ओपनची उपविजेती  डॅनियल कॉलिन्सकडून  ७-६, ६-३ने पराभूत झाली. २०१७ ची विजेती स्लोएन स्टीफेन्स, स्वियातेक,  सबालेंका, पेगला, मुगुरुजा, बेनसिच आणि  प्लिस्कोवा या महिला खेळाडूंनी एकेरीत विजयासह कूच केली.

राफेल नदालचीही मुसंडीदरम्यान, पुरुष एकेरीत २२ वेळेचा ग्रॅण्डस्लॅम विजेता स्पेनचा राफेल नदाल याने पहिला सेट गमविल्यानंतरही जोरदार मुसंडी मारताना २१ वर्षांचा रिंकी हिजिकाता याच्यावर ४-६, ६-२, ६-३, ६-३ने विजय नोंदविला. नोवाक जोकोविच, ॲण्डी मरे आणि राफेल नदाल या दिग्गजांवर खळबळजनक विजयाची नोंद करणारा अमेरिकेचा ॲम क्वेरी याने यूएस ओपनच्या सलामीला पराभवाचा धक्का बसताच टेनिसला रामराम ठोकला. कॅलिफोर्निया येथील नागरिक क्वेरी मंगळवारी उशिरा बेलारूसचा इल्या इवाश्का याच्याकडून ४-६, ६-४,७-५ ने पराभूत झाला. क्वेरीची कारकिर्दीत सर्वोच्च रॅँकिंग ११ राहिली. त्याने २०१७ ला ॲण्डी मरेला नमवून विम्बल्डनची उपांत्य फेरी गाठली होती.

टॅग्स :Tennisटेनिस