शहरं
Join us  
Trending Stories
1
"सिंदूर स्फोटक बनतं तेव्हा...’’ पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पाकिस्तानला पुन्हा इशारा 
2
अमेरिकेने जगातील सर्वात शक्तिशाली अणु क्षेपणास्त्राची चाचणी केली; काही मिनिटांत शत्रूचा नाश करणार
3
१५ कोटींचे टार्गेट होते...! खोतकरांची ठेकेदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याची धमकी; धुळे विश्रामगृहातील पैशांवर राऊतांचा मोठा दावा
4
वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रे इंग्लंडला जाणार! विराट-रोहितच्या कसोटी निवृत्तीनंतर BCCIची मोठी घोषणा
5
फोन आला अन् बाणेर हायवेवर अज्ञाताने वैष्णवीचे बाळ दिले; कुटुंबीयांची माहिती, आजोबा म्हणाले 'आयुष्यभर सांभाळू...'
6
घरातील सर्वांचा विरोध; तरीही वैष्णवीचा लव मॅरेजसाठी हट्ट, मामाने सगळा घटनाक्रम सांगितला..
7
पाकिस्तानी लष्करप्रमुख धार्मिक कट्टर..; परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी केली आसिम मुनीरची पोलखोल
8
आरोग्य विमा ३० वर्षांचे होण्याआधीच घ्या, नाहीतर 'महाग' पडेल! जाणून घ्या ७ मोठे फायदे
9
Apara Ekadashi 2025: एकादशीचा उपास निरोगी आयुष्य देणारा; फक्त त्यादिवशी 'हा' पदार्थ टाळा!
10
“आम्ही सकारात्मक प्रतिसाद दिला, आता राज ठाकरेंनी निर्णय घ्यावा”; ठाकरे गटाचे नेते थेट बोलले
11
"लडकियों को में भी देखता हूं, इतना क्या...", अभिनेत्रीकडे एकटक बघत होता, जाब विचारल्यावर म्हणाला...
12
हृदयद्रावक! भावाच्या जीवाची भीक मागत होती बहीण; पण कोणीच केली नाही मदत, झाली हत्या
13
विमानावर वीज पडली तर काय होते? इंडिगोच्या विमानाने भरवली धडकी, जाणून घ्या किती सुरक्षित...
14
Vaishnavi Hagwane Case : 'वैष्णवीचे बाळ आणायला गेलो,आम्हाला बंदूक दाखवली'; मामांनी सगळंच सांगितलं
15
 काश्मीरमधील किश्तवाड येथील चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान, दोघांना लष्कराने घेरले 
16
Apara Ekadashi 2025: अकाली मृत्युचे भय टळावे, म्हणून अपरा एकादशीला करा 'ही' उपासना!
17
हेरगिरी प्रकरणात ज्योती मल्होत्राला दिलासा नाही, पोलिस कोठडीत आणखी चार दिवसांची वाढ; बँक खात्याची चौकशी सुरूच
18
पाकिस्तानने स्वतः युद्धविरामाची चर्चा केली, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेच्या मध्यस्थीचा दावा फेटाळला!
19
मानवतेचा महामेरु! पत्नी कॅन्सरने गेली, इतर रुग्णांची पैशांअभावी वणवण पाहता पतीची २० लाखांची देगणी
20
आधी वैभव सूर्यवंशीसोबत खोटा फोटो, आता प्रीती झिंटाची थेट कोर्टात धाव, नेमकं प्रकरण काय?

यूएस ओपन :व्हीनस पराभूत! सानिया-पेंग उपांत्य फेरीत तर स्टीफन्स-मेडिसनमध्ये रंगणार अंतिम लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 00:39 IST

अमेरिकेची दिग्गज टेनिसपटू व्हिनस विलियम्स हिला यूएस ओपन स्पर्धेच्या उपांत्य फेरीतच आपला गाशा गुंडाळावा लागला. अमेरिकेच्याच स्लोएने स्टीफन्स हिने चुरशीच्या सामन्यात व्हिनसला पराभवाचा धक्का दिला.

न्यूयॉर्क: अमेरिकेची दिग्गज टेनिसपटू व्हिनस विलियम्स हिला यूएस ओपन स्पर्धेच्या उपांत्य फेरीतच आपला गाशा गुंडाळावा लागला. अमेरिकेच्याच स्लोएने स्टीफन्स हिने चुरशीच्या सामन्यात व्हिनसला पराभवाचा धक्का दिला. तीन महिन्यांआधी गंभीर दुखापतग्रस्त झालेली स्टीफन्स आणि मेडिसन कीस यांच्यात यूएस ओपन टेनिस स्पर्धेत यंदा महिला गटाचा अंतिम सामना खेळला जाईल. विषेष म्हणजे दोघींचा हा पहिलाच अंतिम सामना असेल.डाव्या पायाला दुखापत झाल्याने तब्बल ११ महिने कोर्टपासून दूर राहिलेल्या स्टीफन्सने सातवेळेची चॅम्पियन व्हीनस विलियम्सला ६-१, ०-६, ७-५ असे पराभूत केले. अमेरिकेचीच १५ वी मानांकित मेडिसन कीस ही मनगटाच्या शस्त्रक्रियेनंतर दहा महिन्यांनी कोर्टवर परतली. तिने आपलीच सहकारी २० वी मानांकित कोको वांडेवेगे हिच्यावर ६-१, ६-२ असा विजय नोंदवित अंतिम फेरीत धडक दिली. यूएस ओपनच्या अंतिम फेरीत दोन्ही स्थानिक खेळाडू खेळण्याची १५ वर्षांत ही पहिली वेळ आहे. याआधी २००२ मध्ये सेरेना विलियम्सने व्हीनसला नमविले होते. स्टीफन्स आणि कीस या जीवलग मैत्रिणी आहेत. फेडरेशन चषकाच्या संघात त्या सोबतच खेळतात. स्टीफन्स म्हणाली, ‘आमच्यात जीवाभावाचे नाते आहे. दीर्घकाळ सोबत असताना मैत्रिणीविरुद्ध खेळणे सोपे जाणार नाही.’ दोघींमध्ये आतापर्यंत एकमेव लढत मियामी येथे २०१५ ला झाली. त्यात स्टीफन्सने बाजी मारली होती.सानिया-पेंग उपांत्य फेरीत-भारतीय स्टार सानिया मिर्झा महिला दुहेरी गटाच्या उपांत्य फेरीत दाखल झाली आहे. तिने चीनच्या शुआई पेंगसोबत खेळताना उपांत्यपूर्व सामन्यात टिमिया बाबोस- आंद्रिया लावास्कोवा यांचा ७-६,६-४ असा पराभव केला. आॅस्ट्रेलियन आणि विम्बल्डन स्पर्धेच्या तिसºया फेरीत बाहेर पडलेल्या सानियाची यंदा ही सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. सानिया- पेंग यांचा उपांत्यफेरीत सामना आता मार्टिना हिंगिस- युंग जान चान यांच्याविरुद्ध होईल. सानियाने मागच्यावर्षी आठ जेतेपद पटकविले त्यापैकी पाच जेतेपद मार्टिना हिंगिससोबत होते. वर्षाअखेर दुहेरी रँकिंगमध्ये सानिया अव्वल स्थानावर होती पण हिंगिसपासून विभक्त होताच वारंवार जोडीदार बदलल्याने सानिया नवव्या स्थानावर घसरली.कीस म्हणाली...‘मी सध्या वेगळ्याच फॉर्ममध्ये आहे. कोर्टवर पुनरागमन झाल्याने उत्साहात भर पडली. फायनलमध्ये स्टीफन्सविरुद्ध खेळायला मिळेल याचाही आनंद वाटतो. सध्या स्टीफन्स विश्व क्रमवारीत ८३ व्या स्थानी असली तरी पुढील आठवड्यात ती पहिल्या २५ खेळाडूंमध्ये स्थान मिळवू शकते.’