शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

यूएस ओपन टेनिस: सेरेनाची विजयी सलामी, हालेपचा धक्कादायक पराभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2022 09:24 IST

US Open Tennis: कारकिर्दीतली शेवटची स्पर्धा खेळत असलेल्या सेरेना विलियम्सने माॅंटेनिग्रोच्या दांका कोविनिचचा पराभव करत विजयी सलामी दिली. तर  जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावर असलेल्या सिमोना हालेप हिला मात्र पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला.

न्यूयॉर्क :  कारकिर्दीतली शेवटची स्पर्धा खेळत असलेल्या सेरेना विलियम्सने माॅंटेनिग्रोच्या दांका कोविनिचचा पराभव करत विजयी सलामी दिली. तर  जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावर असलेल्या सिमोना हालेप हिला मात्र पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला.

 गतविजेता आणि जागतिक क्रमवारीत अव्वल असलेला रशियाचा दानिल मेदवेदेव याच्यासह ब्रिटनच्या अँडी मरे यांनी आपापल्या सामन्यात बाजी मारताना यूएस ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेत विजयी सलामी दिली. मेदवेदेवने अपेक्षित विजयी सुरुवात करताना अमेरिकेच्या स्टीफन कोजलोव याचा ६-२, ६-४, ६-० असा धुव्वा उडवला. दुसऱ्या फेरीत मेदवेदेव आता फ्रान्सच्या आर्थर रिंडरनेशविरुद्ध खेळेल. ब्रिटनचा स्टार टेनिसपटू अँडी मरे यानेही तीन सेटमध्ये विजय मिळवताना अर्जेंटिनाच्या फ्रान्सिस्को कारुनडोलो याचा ७-५, ६-३, ६-३ असा पराभव केला. पुरुषांमध्ये चौथ्या मानांकित स्टेफानोस सिटसिपासच्या पराभवाने खळबळ माजली. पात्रता फेरीत आगेकूच केलेल्या डेनियल इलाही गलान याने ६-०, ६-१, ३-६, ७-५ असा जबरदस्त विजय मिळवत सर्वांचे लक्ष वेधले. 

दिग्गज सेरेना विलियम्सने विजयी सलामी देताना दांका कोविनिचचा ६-३, ६-३ असा फडशा पाडला. सेरेना आपल्या कारकिर्दीतील अखेरच्या ग्रँडस्लॅम स्पर्धेत खेळत आहे.विशेष म्हणजे वयाच्या १७ वर्षी सेरेनाने १९९९ मध्ये पहिल्यांदा ही स्पर्धा जिंकली होती.

ऑलिम्पियाने केली आईसारखी स्टाइल सेरेनाने १९९९ साली पहिल्यांदाच यूएस ओपन जेतेपद पटकावले होते, तेव्हा तिने केसांमध्ये मोती लावले होते. आता ४० वर्षीय सेरेना आपली अखेरची ग्रँडस्लॅम स्पर्धा खेळत असून या लढतीदरम्यान सेरेनाची मुलगी ‘ऑलिम्पिया’ हिने लक्ष वेधले. कारण ऑलिम्पिया आईप्रमाणेच केसांमध्ये मोती लावून स्टेडियममध्ये उपस्थित राहिली होती.

टॅग्स :serena williamsसेरेना विल्यम्सTennisटेनिस