शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधाऱ्यांकडून राज्यात २ हजार कोटींचे वाटप; आमदार रोहित पवारांचा गंभीर आरोप
2
Breaking: मोठी बातमी! शिक्षक, पदवीधर विधान परिषद निवडणूक पुढे ढकलली
3
Narendra Modi : "केरळने धडा शिकवला, उत्तर प्रदेशच्या जनतेनेही ओळखलंय"; मोदींचा राहुल गांधींना खोचक टोला
4
कार्तिकी गायकवाडच्या घरी 'लिटील चॅम्प'चं आगमन; पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज
5
UPSC मध्ये घटस्फोटित कोट्यातून नोकरीसाठी पतीला सोडलं, पहिल्याच Marriage Anniversary ला केली विचित्र मागणी
6
"बायको गेल्यानंतर स्वत:ला संपवायचं ठरवलं होतं", कठीण काळाबद्दल बोलताना भूषण कडू भावुक
7
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; अदानी एन्टरप्राईजेसमध्ये तेजी, Cipla घसरला
8
जगातील सर्वात पॉवरफुल क्रॉसओवर बाईक BMW M 1000 XR लाँच,  जाणून घ्या किंमत...
9
मराठा आरक्षण आंदोलनाचा 'एल्गार', मनोज जरांगे पाटील ४ जूनपासून पुन्हा उपोषण करणार
10
RCB vs CSK सामन्यावर पावसाचं सावट! सामना रद्द झाल्यास प्ले ऑफमध्ये कोण जाणार?
11
घाटकोपरसारखीच चूक २१ वेळा; होर्डिंग दुर्घटनेला जबाबदार असलेला भावेश भिंडे कोण आहे?
12
Weather Alert: मुंबईत आजही पाऊस लावणार हजेरी; राज्यातील ९ जिल्ह्यांना 'यलो अलर्ट'; असा आहे हवामान अंदाज!
13
शुभकार्यासाठी निघाले होते, पण...; बस-कारच्या धडकेत कुटुंबातील तिघांचा मृत्यू, चिमुकला बचावला
14
Women World Cup 2024: भारत वर्ल्ड कपची सेमीफायनल खेळणारच; हरमनने सांगितले तगडे आव्हान
15
सध्याचे चित्र बघून मोदींचा चेहरा काळा पडलाय, शाह यांची दाढी जळाली; शिंदेंवरही राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
16
मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात वाद? हार्दिक सरावाला येताच रोहितसह तिघांनी मैदान सोडले
17
भीषण! इंडोनेशियामध्ये नवी आपत्ती... Cold Lava चा कहर; 52 जणांचा मृत्यू, 249 घरं उद्ध्वस्त
18
'गलिच्छ! साडी नेसून लोकांच्या मांडीवर बसतो', कपिल शर्मा शोवर भडकला सुनील पाल
19
Video: बापरे..! चिखलात लपलेल्या मगरीने अचानक उघडला जबडा अन् पुढे जे घडलं...
20
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच दाखल होणार मान्सून; महाराष्ट्रात कधी बरसणार?

टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस : युकी भांब्रीचा दुस-या फेरीत प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2018 2:06 AM

भारताच्या युकी भांब्रीने महाराष्ट्राचा अव्वल खेळाडू अर्जुन कढेचा सरळ दोन सेटमध्ये ६-३, ६-४ गुणांनी पराभव करून एटीपी महाराष्ट्र ओपन टेनिस स्पर्धेत दुसºया फेरीत प्रवेश केला.

पुणे - भारताच्या युकी भांब्रीने महाराष्ट्राचा अव्वल खेळाडू अर्जुन कढेचा सरळ दोन सेटमध्ये ६-३, ६-४ गुणांनी पराभव करून एटीपी महाराष्ट्र ओपन टेनिस स्पर्धेत दुसºया फेरीत प्रवेश केला. भारताच्या सुमित नागलला एकेरीत आणि लिएंडर पेस व पूरव राजा या जोडीला दुहेरीत पराभवाचा सामना करावा लागला.महाराष्ट्र टेनिस संघटनेच्या वतीने म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत एकेरीत पहिल्या फेरीत १ तास १५ मिनिटे चाललेल्या सामन्यात युकी भांब्रीने अर्जुन कढेचा ६-३, ६-४ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. या वेळी युकी भांब्री म्हणाला की, पुणे माझ्यासाठी नेहमीच लकी ठरले आहे. पुण्यातील प्रेक्षकांचे प्रेम व प्रोत्साहन मिळाल्याबद्दल त्यांचे आभार.एकेरीच्या लढतीत जागतिक क्रमवारीत २२३ असलेल्या भारताच्या सुमीत नागलला जागतिक क्रमवारीत २३० क्रमांकावर असलेल्या बेलारुसच्या इल्या इव्हाश्काकडून १ तास २० मिनिटे चाललेल्या लढतीत ६-३, ६-३ गुणांनी पराभवाचा सामना करावा लागला. दुहेरीत पहिल्या फेरीत स्वीडनच्या रॉबर्ट लिंडास्टेडने क्रोएशियाच्या फ्रँको स्कुगरच्या साथीत हंगेरीच्या मार्टन फॉक्सोविक्स व कझाकस्तानच्या मिकेल कुकुश्किन या जोडीचा ६-४, ६-१ असा पराभव करून आगेकूच केली.दुहेरीमध्ये पहिल्या फेरीत रोहन बोपण्णा आणि जीवन नेदुचेझियन या जोडीने भारताचा अव्वल टेनिसपटू लिएंडर पेस व पूरवराजा या जोडीचा ६-३, ६-२ असा पराभव करून बाहेरचा रस्ता दाखविला. जागतिक क्रमवारीत १०२ क्रमांकावर असलेल्या जीवनने आक्रमक फटके मारले.स्पर्धेचा सविस्तर निकाल : पहिली फेरीइल्या इव्हाश्का (बेलारूस) वि.वि. सुमित नागल (भारत) ६-३, ६-३;दुहेरी: पहिली फेरी : रॉबर्ट लिंडास्टेड (स्वीडन)/ फ्रँको स्कुगर (क्रोएशिया) वि.वि. मार्टन फॉक्सोविक्स (हंगेरी)/ मिकेल कुकुश्किन (कझाकस्तान) ६-४, ६-१; रोमन जेबाव्ही (प्रजासत्ताक)/ जेरी व्हेस्ली (प्रजासत्ताक) वि.वि.टेनी सॅन्डग्रेन (यूएसए)/ राडू अल्बोट ६-४, ६-३; पिएरे ह्युजूस हर्बर्ट(फ्रान्स)/ गिल्स सिमॉन (फ्रान्स) वि.वि.केविन अँड्रेसन (दक्षिण अफ्रिका)/ जोनाथन एलरीच (इस्राईल) ३-६, ६-३, १०-५.

टॅग्स :Sportsक्रीडा