सिंधू, श्रीकांतची विजयी सलामी; उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 02:48 IST2018-06-28T02:47:51+5:302018-06-28T02:48:02+5:30

भारताचे स्टार शटलर्स पी. व्ही. सिंधू आणि किदंबी श्रीकांत यांनी मलेशिया ओपन वर्ल्ड टूर सूपर ७५0 स्पर्धेत विजयी सलामी दिली.

Sindhu, Srikanth's winning salute; Pre-quarterfinals | सिंधू, श्रीकांतची विजयी सलामी; उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

सिंधू, श्रीकांतची विजयी सलामी; उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

क्वालालंपूर : भारताचे स्टार शटलर्स पी. व्ही. सिंधू आणि किदंबी श्रीकांत यांनी मलेशिया ओपन वर्ल्ड टूर सूपर ७५0 स्पर्धेत विजयी सलामी दिली. याबरोबरच त्यांनी स्पर्धेत उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
राष्ट्रकूल स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्यानंतर सिंधूने विश्रांती घेण्यासाठी उबेर कपमधून माघार घेतली होती. वर्ल्ड टूर स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यात तिने ओहोरीचा २६-२१, २१-१५ ने पराभव केला.
आता सायनाचा पुढील सामना जागतिक मानांकनात तिसऱ्या
स्थानी असलेल्या मलेशियाच्या यिंग यिंग ली हिच्याशी होणार आहे. तर पुरुषांच्या एकेरी गटात श्रीकांतने जागतिक मानांकनात द्वितीय स्थानी असलेल्या डेन्मार्कच्या जॉन जॉर्गेनसनचा २१-१८, २१-९ असा पराभव केला. त्याचा पुढील सामना चिनच्या ताईपे के वांग जु वेई याच्या सोबत होणार आहे. त्याने सिंगापूर ओपन चॅम्पियनशिपमध्ये साई प्रणितचा २१-१२, २१-७ असा पराभव केला होता.

Web Title: Sindhu, Srikanth's winning salute; Pre-quarterfinals