सेरेना विलियम्सने पंचांना खोटारडा, चोर म्हटले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 01:22 AM2018-09-10T01:22:19+5:302018-09-10T01:23:25+5:30

सेरेना विलियम्सने अमेरिकन ओपनचे जेतेपद गमाविल्यानंतर टेनिस खेळ लिंगभेद करणार असल्याचा आरोप केला.

 Serena Williams called the umpires a liar, a thief | सेरेना विलियम्सने पंचांना खोटारडा, चोर म्हटले

सेरेना विलियम्सने पंचांना खोटारडा, चोर म्हटले

googlenewsNext

न्यूयॉर्क : सेरेना विलियम्सने अमेरिकन ओपनचे जेतेपद गमाविल्यानंतर टेनिस खेळ लिंगभेद करणार असल्याचा आरोप केला. अंतिम लढतीनंतर निकालापेक्षा अधिक चर्चा सेरेना व खुर्ची पंच यांच्यादरम्यान झालेल्या वादाबाबत होत आहे. सामन्यादरम्यान दुसऱ्या सेटममध्ये सेरेनाला अम्पायर कार्लोस रामोस यांनी बॉक्समधून कोचिंग घेत असल्याप्रकरणी ताकीद दिली. त्यानंतर रॅकेट फाऊलसाठी या ३६ वर्षीय खेळाडूला दुसºयांदा आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी ताकीद दिली व एका गुणाची पेनल्टी दिली. त्यामुळे अमेरिकन खेळाडूचा राग अनावर झाला आणि तावातावात अम्पायरकडे कूच करीत त्यांना खोटारडे व चोर असे संबोधले.
तिने पंचाला माफी मागण्यासही सांगितले. अंतिम सामन्यानंतर पत्रकारांसोबत बोलताना सेरेना म्हणाली, ‘ते माझ्यावर अप्रामाणिक असल्याचा आरोप करीत होते. मी कोर्टवर असताना प्रशिक्षकाकडून कोणतेही टीप्स घेण्याचा प्रयत्न करत नाही.’ तसेच, ‘यामुळे कोर्टवर महिला व पुरुष खेळाडूंसोबत वेगवेगळे वर्तन होते, याची मला प्रचिती आली. मी येथे महिला अधिकारांसाठी व महिलांना बरोबरीचा हक्क मिळवून देण्यासाठी लढत आहे,’ असेही तिने सांगितले.

सेरेनाने याआधीही घातली होती पंचांशी हुज्जत
दिग्गज सेरेना विलियम्सने यूएस ओपनच्या अंतिम सामन्यादरम्यान पंचांवर नाराजी व्यक्त करताना हुज्जत घातली. ही तिच्याकडून घडलेली पहिलीच घटना नाही. याआधीही ती अशा वर्तनामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.
२००९ मध्ये किम क्लाइस्टर्सविरुद्ध उपांत्य फेरीतही सेरेनाने पंचांविरुद्ध अपशब्द वापरले होते. त्यावेळी, क्लाइस्टर्सला कोणतीही रँकिंग नव्हती आणि तिने सेरेनाविरुद्ध पहिला सेट जिंकला. त्यातच हताश होऊन रॅकेट जमिनीवर आदळल्यामुळे सेरेनाला ताकीदही देण्यात आली. सेरेना दुसºया सेटमध्ये ५-६ वर टायब्रेकरमध्ये सर्व्हिस करीत होती. तेव्हा तिने पाय लाईनच्या पुढे गेल्यामुळे तिला ताकीद देण्यात आली आणि क्लाइस्टर्सला डबल मॅच पॉइंट मिळाला. त्यामुळे सेरेनाने पंचांशी हुज्जत घातली आणि नंतर सर्व्हिस लाईनवर जात लाईनवुमनविरुद्ध अपशब्दाचा उपयोग केला. त्यात तिने धमकावल्याचाही समावेश होता.

Web Title:  Serena Williams called the umpires a liar, a thief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.