देशभक्ती तुमच्याकडून शिकण्याची आवश्यकता नाही, सानिया मिर्झानं नेटकऱ्यांना खडसावलं

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 11:44 AM2019-02-18T11:44:11+5:302019-02-18T11:44:51+5:30

पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना आदरांजली वाहताना टेनिसपटू सानिया मिर्झाने ट्विट केले, परंतु नेटिझन्सने तिला ट्रोल केले. 

Sania Mirza’s Message to Trolls Deserves Attention | देशभक्ती तुमच्याकडून शिकण्याची आवश्यकता नाही, सानिया मिर्झानं नेटकऱ्यांना खडसावलं

देशभक्ती तुमच्याकडून शिकण्याची आवश्यकता नाही, सानिया मिर्झानं नेटकऱ्यांना खडसावलं

googlenewsNext

हैदराबाद : पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतभर शोक व्यक्त केला जात आहे आणि प्रत्येक जण शहीद झालेल्या जवानांप्रती आदर व्यक्त करत आहेत. त्याचवेळी ते दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानविरोधात प्रचंड नाराजीचा सूर उमटला आहे. पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना आदरांजली वाहताना टेनिसपटू सानिया मिर्झाने ट्विट केले, परंतु नेटिझन्सने तिला ट्रोल केले. 


सानियाने त्या नेटकऱ्यांना चांगलेच खडसावताना एक मोठी पोस्ट शेअर केली. ती म्हणाली,''सेलेब्रिटींना त्यांची देशभक्ती सिद्ध करण्यासाठी कोहण्याही हल्ल्यानंतर ट्विट किंवा इंस्टाग्रामवर पोस्ट करणे गरजेचे आहे, असे अनेकांना वाटते. त्यांने सेलेब्रिटींना देशाप्रती प्रेम वाटते की नाही, हे सिद्ध होते, असाची त्यांचा समज आहे. पण, सेलेब्रिटींवर टीका करणाऱ्या व्यक्ती या स्वतः नैराश्याने ग्रासलेले असतात आणि राग व्यक्त करण्यासाठी त्यांना कोण भेटत नाही. त्यामुळे ते सेलेब्रिटींना टारगेट करून द्वेष पसरवतात.''  


सानियाने पुढे लिहिले की,'' मी भारतासाठी खेळते. देशाला पदक मिळवून देण्यासाठी मेहनत घेते.  मी शहीद जवानांच्या कुटुंबीयांसोबत आहे. हे जवान आपले खरे नायक आहेत. 14 फेब्रुवारीचा दिवस हा काळा दिवस होता आणि असा दिवस पुन्हा पाहायला मिळणार नाही, अशी आशा करते.''  


सानियाचा जन्म हा हैदराबादचा, परंतु तिने 2010 मध्ये पाकिस्तान क्रिकेटपटू शोएब मलिकशी विवाह केला. त्यानंतर तिला भारत-पाकिस्तान यांच्यातल्या वादात सतत नेटकऱ्यांच्या टीकेचा सामना करावा लागत आहे. 
सानियाचे लग्न तिचा लहानपणीचा मित्र सोहराबबरोबर ठरले होते. २००९ साली सानिया आणि सोहराब यांचा साखरपूडा झाला होता. पण हा साखरपुडा मोडण्यात आला. त्याचवेळी सानियाचे करीअरमध्येही काही चांगले सुरु नव्हते. वाईट फॉर्मातून सानिया जात होती. दुसरीकडे शोएबलाही क्रिकेटमध्ये जास्त धावा करता येत नव्हता.  सानिया आणि शोएब ऑस्ट्रेलियातील स्पर्धांच्यावेळी एकत्र आले. त्यावेळी दोघांमध्ये संवाद घडला. या संवादाचे पुढे मैत्रीमध्ये आणि त्यानंतर प्रेमात रुपांतर झाले. जेव्हा सानिया आणि शोएब भेटले तेव्हा ते दोघेही समदु:खी होते. पण लग्न केल्यावर मात्र दोघांचे आयुष्य पालटून गेले.

Web Title: Sania Mirza’s Message to Trolls Deserves Attention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.