शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Sania Mirza-Shoaib Malik : घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान सानिया मिर्झाची भावनिक पोस्ट; म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2022 08:56 IST

Sania Mirza-Shoaib Malik : सानियाने इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट केली आहे. या पोस्टमुळे घटस्फोटाच्या बातम्यांना अधिक हवा मिळाली आहे.

भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांच्यातील घटस्फोटाबाबत जोरदार चर्चा  सुरू आहेत. पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्समध्ये तर सानिया आणि शोएबचा अधिकृत घटस्फोट झाल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच, दोघेही वेगळे राहत असल्याचे म्हटले आहे. मात्र, या प्रकरणी सानिया आणि शोएबकडून अद्याप कोणतेही वक्तव्य आलेले नाही.

दरम्यान, सानियाने इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट केली आहे. या पोस्टमुळे घटस्फोटाच्या बातम्यांना अधिक हवा मिळाली आहे. तुम्ही प्रकाश आणि अंधाराने एकत्र येऊन बनलेली व्यक्ती आहात. जेव्हा तुमचे हृदय जड होईल किंवा असे काहीतरी वाटत असते, तेव्हा तुम्ही स्वतःला ब्रेक द्यायला शिकणे महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला कधी कमजोरी जाणवत असेल तर तुम्ही स्वतःवर खूप प्रेम करायला शिकणे खूप महत्वाचे आहे, असे सानियाने इन्स्टा स्टोरीमध्ये लिहिले आहे.

सानियाच्या या पोस्टवरून नक्कीच काहीतरी गडबड असल्याचे म्हटले जाते. इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये सानियाने पोस्ट शेअर करत लिहिले आहे की, "तू माणूस आहेस. प्रकाश आणि गडद बनलेले. जेव्हा तुम्ही थोडे नाजूक होण्यास सुरुवात करता तेव्हा तुम्ही स्वतःवर खूप प्रेम करता. जेव्हा तुमचे हृदय जड वाटत असेल तेव्हा तुम्ही स्वतःला ब्रेक द्यायला शिका."

दरम्यान, सानिया मिर्झा 15 नोव्हेंबरलाच 36 वर्षांची झाली आहे. त्यावेळी तिचा पती शोएबनेही तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. शोएबने सानियासोबतचा स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. त्याने फोटोसोबत लिहिले की, 'वाढदिवसाच्या शुभेच्छा सानिया मिर्झा, मी तुला निरोगी आणि आनंदी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. तुझा दिवस आनंदात जावो.

यासोबतच एक बातमी समोर आली होती की, सानिया आणि शोएबचा टॉक शो एकत्र येणार आहे. हा शो पाकिस्तानच्या एका वाहिनीवर येणार आहे. याच वाहिनीने सानिया आणि शोएबचे पोस्टरही शेअर केले आहे. 'मिर्झा मलिक शो' असे या नवीन शोचे नाव आहे. या दोन्ही घटनांनंतर चाहत्यांना वाटले की कदाचित घटस्फोटाची बाब चुकीची आहे. पण, आता सानियाच्या या पोस्टने चाहत्यांमध्ये पुन्हा गोंधळ उडाला आहे.

टॅग्स :Sania Mirzaसानिया मिर्झाShoaib Malikशोएब मलिकDivorceघटस्फोट