Rafael Nadal, Citiusipas third round | राफेल नदाल, सिटिसिपास तिसऱ्या फेरीत
राफेल नदाल, सिटिसिपास तिसऱ्या फेरीत

पॅरीस : राफेल नदालने आपल्या १२ व्या फ्रेंच ओपनच्या विजेतेपदाच्या दिशेने आगेकूच करताना यानिक माडेनला पराभूत केले. स्वित्झर्लंडचा दिग्गज रॉजर फेडररनही तिसरी फेरी गाठताना जर्मनीच्या आॅस्कर ओटे याचे आव्हान संपुष्टात आणले. सहाव्या मानांकित स्टिफोनस सिटिसिपासला मात्र झुंजावे लागले.
नदालने जर्मनीच्या यानिक माडेन याला ६-१, ६-२, ६-४ अशा सरळ सेटमध्ये पराभूत केले. १७ ग्रॅँड स्लॅम विजेता नदाल पुढील फेरीत डेव्हिड गोफिनशी लढेल. दुसरीकडे दिग्गज फेडररने १५व्यांदा फ्रेंच ओपनची तिसरी फेरी गाठताना आॅस्करचा ६-४, ६-३, ६-४ असा सहज पराभव केला. तसेचम सिटिसिपासला बोलिव्हियाच्या ह्यूगो डेलियनने चांगलीच लढत दिली. सिटिसिपास याने ही लढत ४-६, ६-०, ६-३, ७-५ अशी जिंकत प्रथमच फ्रेंच ओपनच्या तिसºया फेरीत प्रवेश केला. महिलांमध्ये युक्रेनच्या इलिना स्वितोलिनान तिसरी फेरी गाठली. कॅटरिना कोजलोवाने माघार घेतल्याने तिला पुढे चाल मिळाली.


Web Title: Rafael Nadal, Citiusipas third round
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.