शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये विलगीकरणाचे नियम कडक; पोलिसांची राहणार पाळत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2021 07:11 IST

नियमांचे उल्लंघन केले तर कुठली कारवाई होईल, याबाबत सांगण्यात आलेले आहे. जर विलगीकरणाच्या नियमांचे उल्लंघन झाले तर त्यांना मोठ्या रकमेच्या दंडासह अधिक सुरक्षित विलगीकरण परिसरामध्ये पाठविण्यात येईल.

मेलबर्न :ऑस्ट्रेलियन ओपनसाठी येथे दोन विशेष विमानाने दाखल झालेल्या ४७ खेळाडूंना विलगीकरणात पाठविण्यात आले आहे. कारण त्यापैकी चार व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. स्थानिक स्वास्थ्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, सर्व खेळाडूंना यापूर्वी जोखमीची कल्पना देण्यात आलेली आहे. नियमांचे उल्लंघन केले तर कुठली कारवाई होईल, याबाबत सांगण्यात आलेले आहे. जर विलगीकरणाच्या नियमांचे उल्लंघन झाले तर त्यांना मोठ्या रकमेच्या दंडासह अधिक सुरक्षित विलगीकरण परिसरामध्ये पाठविण्यात येईल. तेथे त्यांच्या हॉटेलच्या रूमच्या दाराच्या बाहेर पोलीस तैनात राहतील. सध्या काही खेळाडू यामुळे नाराज आहे. पॉझिटिव्ह आलेल्या लोकांसोबत विमानप्रवास केल्यामुळे त्यांना ‘जवळचा संपर्क’ गटात ठेवण्यात आलेले आहे. त्यामुळे त्यांना अन्य खेळाडूंच्या तुलनेत कडक विलगीकरणात राहावे लागणार आहे. अन्य खेळाडूंना आपल्या ररूमबाहेर पडून रोज पाच तास सराव करण्याची परवानगी राहणार आहे. तर जवळच्या संपर्क गटात असलेल्या खेळाडूंना तशी मुभा नाही. ते रूमच्या बाहेर पडू शकणार नाही.शनिवारी तीन व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्याची घोषणा करण्यात आली होती. लॉस एंजिलिसच्या फ्लाइटमधील एक क्रु सदस्य, एक प्रशिक्षक व टीव्ही प्रसारण टीममधील एक सदस्य पॉझिटिव्ह आढळला होता. एक अन्य कोरोना पॉझिटिव्ह अबुधाबीहून आलेल्या विमानातील आहे. तेथे एक प्रशिक्षक पॉझिटिव्ह आढळले आहेत. स्पर्धेच्या आयोजकांनी सांगितले की, लॉस एंजिलिस व अबुधाबी येथून आलेल्या विमानातील एकूण चार व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्या आहेत.

१४ दिवसासाठी हॉटेलमध्ये विलगीकरण- अधिकाऱ्यांनी सांगितले की, लॉस एंजिलिस येथून आलेल्या विशेष विमानामध्ये कोविड-१९चे तीन रुग्ण आढळले तर अबुधाबी येथून आलेल्या विमानात एक रुग्ण आढळून आला.- दोन वेळची चॅम्पियन व्हिक्टोरिया अजारेंका व २०१४चा अमेरिकन ओपन उपविजेता केई निशिकोरी लॉस एंजिलिस येथून आलेल्या विमानात होते. त्याआधी, अधिकाऱ्याने सांगितले की, लॉस एंजिलिस येथून आलेल्या सर्व प्रवाश्यांना १४ दिवसांच्या कालावधीसाठी हॉटेलमध्ये कडक विलगीकरणात पाठविण्यात आले आहे.

टॅग्स :Australian Openऑस्ट्रेलियन ओपनAustraliaआॅस्ट्रेलियाTennisटेनिस