शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

पुणे ओपन आयटीएफ महिला टेनिस : भारताच्या अंकिता रैनाची विजयी सलामी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2018 9:12 PM

ऋतुजा भोसले, स्नेहल माने, जेनिफर लुईखेम या भारतीयांचे आव्हान मात्र संपुष्टात

ठळक मुद्देदुसऱ्या मानांकित अंकिताने लौकिकाला साजेशी खेळ करताना रशियाच्या अमिना अंशाबाचा ६-२, ६-१ असा धुव्वा उडविला.भारताची अवव्ल खेळाडू असलेल्या अंकिताने अमिनावर निर्विवाद वर्चस्व गाजवित बाजी मारली.पुण्याची गुणवान खेळाडू ऋतुजा भोसले पराभूत झाली.

पुणे : विजेतेपदाची दावेदार समजली जाणारी भारताची अंकिता रैना हिने अपेक्षेनुसार खेळ करीत २५ हजार डॉलर पुणे ओपन आयटीएफ महिला अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत एकेरी गटातून मंगळवारी विजयी सलामी दिली. ऋतुजा भोसले, स्नेहल माने आणि जेनिफर लुईखेम या भारतीयांचे आव्हान मात्र पहिल्या फेरीतच संपुष्टात आले.

नवनाथ शेटे स्पोर्ट्स अकादमीतर्फे आयोजित ही स्पर्धा म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील एमएसएलटीए स्कूल आॅफ टेनिस येथे सुरू आहे. दुसऱ्या मानांकित अंकिताने लौकिकाला साजेशी खेळ करताना रशियाच्या अमिना अंशाबाचा ६-२, ६-१ असा धुव्वा उडविला. भारताची अवव्ल खेळाडू असलेल्या अंकिताने अमिनावर निर्विवाद वर्चस्व गाजवित बाजी मारली. रशियाच्या मरिना मेलनिकोवाने वाईल्ड कार्ड द्वारे प्रवेश केलेल्या भारताच्या जेनिफर लुईखेमचे आव्हान टायब्रेकमध्ये ७-६ (२), ६-३ असे परतवून लावले. पहिल्या सेटमध्ये झुंजार खेळ करणाºया लुईखेमला दुसºया सेटमध्ये मरिनाने फारशी संधीच दिली नाही.पुण्याची गुणवान खेळाडू ऋतुजा भोसले कडव्या संघर्षानंतर चीनच्या कै-लीन झाँग हिच्याकडून ७-६ (६), ७-६ (५)ने पराभूत झाली. भारताच्या ऋतुजा भोसलेने विजयासाठी चांगलेच झुंजवले. संपूर्ण सामन्यात दोन्ही खेळाडूंनी झुंजार खेळ केला. मात्र, दोन्ही सेटमध्ये निर्णायक क्षणी खेळ उंचावता न आल्याने ऋतुजा स्पर्धेबाहेर झाली.सहाव्या मानांकित इस्राईलच्या डेनिझ खझानुक हिने भारताच्या स्नेहल मानेला ६-३, ६-१ असे नमविले. युक्रेनच्या व्हॅलेरिया स्राखोवा हिने सातव्या मानांकित ग्रेट ब्रिटनच्या कॅटी ड्युनचा ६-१, ६-३ असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदविला. आठव्या मानांकित नेदरलँडच्या क्युरिनी लेमणीने क्वालिफायर स्लोव्हेनियाच्या पीआ कूकचे आव्हान ६-१, ६-१ असे संपुष्टात आणले.

निकाल : पहिली फेरी :एकेरी गट : तामरा झिदनसेक (स्लोव्हेनिया) वि. वि. या-सुआन ली (तैपेई) ६-३, ६-३. अंकिता रैना (भारत) वि. वि. अमिना अंशाबा (रशिया) ६-२, ६-१. मरिना मेलनिकोवा (रशिया) वि. वि. जेनिफर लुईखेम (भारत) ७-६ (२), ६-३. कै-लीन झाँग (चीन) वि. वि. ऋतुजा भोसले (भारत) ७-६ (६), ७-६ (५). डेनिझ खझानुक (इस्राईल) वि. वि. स्नेहल माने (भारत) ६-३, ६-१. व्हॅलेरिया स्राखोवा (युक्रेन) वि. वि. कॅटी ड्युन (ग्रेट ब्रिटन) ६-१, ६-३. क्युरिनी लेमणी (नेदरलँड) वि. वि. पीआ कूक (स्लोव्हेनिया) ६-१, ६-१. ओल्गा दोरोशिना (रशिया) वि. वि. कॅतरझायना कावा (पोलंड) ६-३, ६-२. रेका-लुका जनी (हंगेरी) वि. वि. कायलाह मॅकफी (आॅस्ट्रेलिया) १-६, ७-६ (२), ७-६ (३). जॅकलिन अ‍ॅडिना क्रिस्टियन वि. वि. मियाबी इनाऊ (जपान) ६-१, ७-५. जिया-जिंग लू (चीन) वि. वि. कॅटरझयाना पीटर (पोलंड) ६-१, २-६, ६-४

दुहेरी गट : अलेक्झांड्रा नेदिनोवा (बल्जेरिया)-तामरा झिदनसेक (स्लोव्हेनिया) वि. वि. मारिया मारफुतीना (रशिया)-अ‍ॅना मोर्जिना (रशिया) ६-१, ६-०. अ‍ॅना वेसलिनोविच-याशिना इक्तेरिना (रशिया) वि. वि. मरीम बोलकवडेझ (जॉर्जिया)-अल्बिना खबिबुलीना (उझबेकिस्तान) ७-६ (२), ६-४.

टॅग्स :TennisटेनिसPuneपुणे