शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

लढत स्थगित करा, किंवा स्थळ बदला, भारत- पाक सामन्याबाबत टेनिस संघटनेने आयटीएफला ठणकावले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2019 4:50 AM

अ.भा. टेनिस संघटनेने (एआयटीए) विश्व टेनिस महासंघाला (आयटीएफ) पाकिस्तानविरुद्धची डेव्हिस चषक टेनिस लढत इस्लामाबादहून त्रयस्थ ठिकाणी हलवण्यासाठी स्वत: पुढाकार घ्यावा किंवा ही लढत रद्द करावी, असे बुधवारी ठणकावून सांगितले.

नवी दिल्ली: अ.भा. टेनिस संघटनेने (एआयटीए) विश्व टेनिस महासंघाला (आयटीएफ) पाकिस्तानविरुद्धची डेव्हिस चषक टेनिस लढत इस्लामाबादहून त्रयस्थ ठिकाणी हलवण्यासाठी स्वत: पुढाकार घ्यावा किंवा ही लढत रद्द करावी, असे बुधवारी ठणकावून सांगितले.आधीपेक्षा अधिक ताठर भूमिका घेणाऱ्या एआयटीएने १४-१५ सप्टेंबर रोजी होणाºया आशिया- ओशियाना डेव्हिस चषक टेनिस सामन्यासाठी आपण स्वत:हून स्थान बदलण्याचा आग्रह करणार नाही. आयटीएफने स्वत:हूनच पुढाकार घ्यावा आणि परिस्थितीचा आढावा घेत लढतीचा निर्णय घ्यावा, असे स्पष्ट केले. भारताला काही विनंती करायची नाही, लढत आयोजित करण्याची अथवा रद्द करण्याची जबाबदारी आयटीएफचीच आहे, असे एआयटीएला वाटते.आयटीएफचे कार्यकारी संचालक जस्टिन अल्बर्ट यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात एआयटीए म्हणते,‘ सद्यस्थिती पाहता आयटीएफच्या संचालक मंडळाने दोन पर्याय निवडायला हवे. एकतर डेव्हिस चषक लढत नोव्हेंबर/डिसेंबरपर्यंत स्थगित करावी, किंवा ती त्रयस्थ ठिकाणी आयोजित करावी. याआधी अल्बर्ट यांनी इस्लामाबादच्या सुरक्षा व्यवस्थेवर आयटीएफ समाधानी असल्याचे वक्तव्य केले होते.भारत-पाक लढत त्रयस्थ ठिकाणी व्हावी, अशी विनंती भारतीय संघातील खेळाडूंनी केली पण भारतीय टेनिस संघटना मात्र सुरक्षा व्यवस्थेची हमी मागत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.‘आम्ही भारतीय टेनिस संघटनेकडे त्रयस्थ ठिकाणी सामन्याची विनंती केली आहे’ असे भारताचा कर्णधार महेश भूपतीने सांगितले. संघटना हे प्रकरण ज्या पद्धतीने हाताळत आहे, हे पाहून आश्चर्य वाटले, असे अन्य खेळाडूने म्हटले आहे.

त्रयस्थ ठिकाणी पाकिस्तानशी डेव्हिस चषक सामना खेळवण्यात यावा, अशी वारंवार मागणी भारतीय टेनिस संघटनेकडून केली जात असल्याचे चर्चेत आहे.

परंतु संघटनेचे सरचिटणीस हिरण्यमय चॅटर्जी यांनी फक्त कडेकोट सुरक्षेची हमी आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाकडे मागितल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे खेळाडू आणि संघ व्यवस्थापन निराश झाल्याने त्यांनी संघटनेशी संपर्क साधला आहे.

संघटना हे प्रकरण ज्या पद्धतीने हाताळत आहे, हे पाहून आश्चर्य वाटले, असे अन्य खेळाडूने म्हटले आहे.सुरक्षा व्यवस्थेसंदर्भातील ताज्या आढाव्यानंतर आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने हिरवा कंदील दिल्यास १४ आणि १५ सप्टेंबरला होणाºया सामन्यासाठी व्हिसा प्रक्रिया करावी लागणार आहे, असे भारतीय टेनिस संघटनेने सांगितले.जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे भारत-पाकिस्तान यांच्यातील राजकीय संबंध पुन्हा बिघडले. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने डेव्हिस चषक लढतीबाबत ठोस भूमिका घेण्याची आवश्यकता आहे,’असे टेनिस संघटनेतील एका गटाचे म्हणणे आहे.ही लढत द्विपक्षीय मालिका नाही. डेव्हिस चषक लढतीचे आयोजन जागतिक संघटना करीत असते. त्यामुळे माघार घेणे योग्य ठरणार नाही,’ असे क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले.आॅलिम्पिक क्रीडा प्रकारांना सरकारचा हस्तक्षेप मान्य नसतो. परंतु टेनिसपटू हे भारताचे नागरिक नाहीत का? या खेळाडूंना न थांबवून सरकार त्यांच्या जीवाची जोखीम का पत्करत आहे’ असा प्रश्न एका पदाधिकाºयाने विचारला.

चॅटर्जींनी मांडली भारताची बाजू

हिरण्यमय चॅटर्जी यांनी आयटीएफपुढे भारताची बाजी मांडली. ते म्हणाले,‘सद्यस्थितीत इस्लामाबादला भारतीय उच्चायुक्त नाही. उभय देशांदरम्यान रेल्वे सेवा स्थगित करण्यात आली आहे. याशिवाय बससेवा देखील तात्काळ प्रभावाने स्थगित करण्यात आली. पाकिस्तानात फार तणाव असून भारतीय विमानांसाठी हवाईमार्ग देखील बंद करण्यात आले आहेत. आमच्या चिंतेने आयटीएफ समाधानी होत असेल तर सर्व काही सुरळीत होऊ शकते.’आयटीएफचे समाधान न झाल्यास आम्ही संचालक मंडळापुढे स्वत:ची बाजू मांडण्याची विनंती करणार आहोत.

टॅग्स :TennisटेनिसIndiaभारतPakistanपाकिस्तान