नोव्हाक जोकोव्हिचची पाचव्या स्थानी घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 01:01 IST2017-08-01T01:01:20+5:302017-08-01T01:01:34+5:30

नोव्हाक जोकोव्हिचला एटीपीच्या ताज्या क्रमवारीत एका स्थानाचे नुकसान सोसावे लागले असून, त्याची पाचव्या स्थानी घसरण झाली. स्टेनिसलास वावरिंका चौथ्या स्थानी दाखल झाला आहे.

Novak Djokovic falling fifth | नोव्हाक जोकोव्हिचची पाचव्या स्थानी घसरण

नोव्हाक जोकोव्हिचची पाचव्या स्थानी घसरण

पॅरिस : नोव्हाक जोकोव्हिचला एटीपीच्या ताज्या क्रमवारीत एका स्थानाचे नुकसान सोसावे लागले असून, त्याची पाचव्या स्थानी घसरण झाली. स्टेनिसलास वावरिंका चौथ्या स्थानी दाखल झाला आहे.
जागतिक क्रमवारीत माजी नंबर वन खेळाडू जोकोव्हिचची मानांकनामध्ये आणखी घसरण होण्याची शक्यता आहे. कारण कोपराच्या दुखापतीमुळे या सत्रात यापुढे खेळणार नसल्याचे त्याने यापूर्वीच सांगितले आहे.
जर्मनीच्या अलेक्झांडर ज्वेरेवला तीन स्थानांचा लाभ झाला असून, तो कारकिर्दीतील सर्वोत्तम आठव्या स्थानी पोहोचला आहे. अर्जेंटिनाच्या लियोनार्डो मायेरला सर्वाधिक लाभ झाला आहे. हॅम्बर्ग ओपन स्पर्धेत जेतेपद पटकावल्यानंतर त्याने ८९ स्थानांची झेप घेत ४९ वे स्थान गाठले आहे. लियोनार्डोविरुद्ध अंतिम फेरीत पराभव स्वीकारणाºया फ्लोरियन मायेरला ४५ स्थानांचा लाभ झाला असून, तो ५६ व्या स्थानी आहे.

Web Title: Novak Djokovic falling fifth