राफेल नदालला नमवून निक किर्गीयोस उपांत्य फेरीत, स्पेनच्या डेव्हिड फेररविरुद्ध खेळणार उपांत्य फेरीत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 04:56 IST2017-08-20T04:56:27+5:302017-08-20T04:56:32+5:30

आॅस्ट्रेलियाच्या निक किर्गीयोस याने जागतिक क्रमवारीतील नंबर वन खेळाडू राफेल नदाल याचा ६-२, ७-५ असा पराभव करताना सिनसिनाटी मास्टर्स एटीपी डब्ल्यूटीए स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली.

Nic Kgioros defeats Spain's David Ferrer in the semi-finals by defeating Rafael Nadal | राफेल नदालला नमवून निक किर्गीयोस उपांत्य फेरीत, स्पेनच्या डेव्हिड फेररविरुद्ध खेळणार उपांत्य फेरीत 

राफेल नदालला नमवून निक किर्गीयोस उपांत्य फेरीत, स्पेनच्या डेव्हिड फेररविरुद्ध खेळणार उपांत्य फेरीत 

सिनसिनाटी : आॅस्ट्रेलियाच्या निक किर्गीयोस याने जागतिक क्रमवारीतील नंबर वन खेळाडू राफेल नदाल याचा ६-२, ७-५ असा पराभव करताना सिनसिनाटी मास्टर्स एटीपी डब्ल्यूटीए स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली.
या दिवसाच्या खेळाचे आकर्षणही जागतिक क्रमवारीतील २३ वा मानांकित किर्गीयोस
ठरला. आता तो उपांत्य फेरीत स्पेनच्या डेव्हिड फेररविरुद्ध खेळेल. दुसरा उपांत्य फेरीचा सामना बल्गेरियाच्या ११ व्या मानांकित ग्रिगोर दिमित्रोव व अमेरिकेच्या जॉन इस्नेर यांच्यात होईल.
तत्पूर्वी, किर्गीयोसने क्रोएशियाच्या इवो कार्लोविच याचा ४-६, ७-६, ६-३ असा पराभव केला होता, तर नदालने अल्बर्ट रामोस विनोलेस याच्यावर ७-६, ६-२ असा विजय मिळवला होता.
महिला गटात कॅरोलिना प्लिसकोव्हाने इटलीच्या क्वॉलिफायर कामिला जियोर्जी हिचा ६-३,
४-६, ६-० असा पराभव केला. पावसामुळे काल पाच सामने
स्थगित करण्यात आले ते आज खेळवण्यात आले.
द्वितीय मानांकित रोमानियाच्या सिमोना हालेप हिने ब्रिटनच्या
सातव्या मानांकित जोहान
कोंटा हिच्यावर ६-४, ७-६ अशी
मात केली. (वृत्तसंस्था)

Web Title: Nic Kgioros defeats Spain's David Ferrer in the semi-finals by defeating Rafael Nadal