शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: भाजपचे जोरदार धक्कातंत्र! उज्ज्वल निकमांना लोकसभेची उमेदवारी; पूनम महाजनांचे तिकीट कापले
2
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
3
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
4
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
5
जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला FAKE व्हिडीओ; निवडणूक आयोगाकडून होणार कायदेशीर कारवाई
6
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
7
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
8
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
9
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
10
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
11
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
12
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
13
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
14
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
15
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
16
Sadguru Diet: सद्गुरू सांगताहेत बॅलेन्स डाएटचा कानमंत्र; वजन कमी होईल आणि नियंत्रितही राहील!
17
"...मग साताऱ्यात उदयनराजेंच्या विरोधात प्रचार का करताय?", भाजपाचा संजय राऊतांना सवाल
18
TMKOC Sodhi Missing: गुरुचरण सिंग बेपत्ता प्रकरणावर पोलिसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'काही क्लू मिळालेत...'
19
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
20
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 

‘वॉकओव्हर’सह नदालने गाठली तिसरी फेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 4:57 AM

यूएस ओपन : १५ वर्षांच्या कोको गौफची लढत ओसाकाविरुद्ध

न्यूयॉर्क : १५ वर्षांची अमेरिकेची टेनिसपटू कोको गौफ यूएस ओपन टेनिसच्या तिसऱ्या फेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावरील नाओमी ओसाकाविरुद्ध खेळेल. पुरुष गटात राफेल नदालने वॉकओव्हरसह तिसरी फेरी गाठली. विद्यमान विम्बल्डन चॅम्पियन सिमोना हालेप सलग तिसºया वर्षी यूएस ओपनच्या पहिल्या फेरीत बाहेर पडली. तीन सेटपर्यत रंगलेल्या संघर्षात सिमोनाला ११६ व्या स्थानावरील टेलर साऊनसेंडने नमविले.

कोको गौफने हंगेरीच्या टिमिया बाबोस हिचा ६-२, ४-६, ६-४ ने पराभव केला. यासह १९९६ मध्ये अ‍ॅना कुर्निकोव्हानंतर यूएस ओपनच्या अंतिम ३२ खेळाडूंमध्ये दाखल होणारी दुसरी युवा खेळाडू ठरली.तीन वेळेचा यूएस चॅम्पियन नदालला आॅस्ट्रेलियाचा थानासी कोकिनाकिस या दुखापतीमुळे माघार घेतल्याने चाल मिळाली. नदाल कोरियाचा नवखा खेळाडू चींग हियोनविरुद्ध खेळेल. सहावा मानांकित अलेक्झांडर ज्वेरेव्हने अमेरिकेचा फ्रान्सिस टियाफीवर पाच सेटमधील संघर्षात ६-३, ३-६, ६-२, २-६, ६-३ असा रोमांचक विजय मिळविला. (वृत्तसंस्था)महिला गटात टाऊनसेंटने चौथ्या मानांकित हालेपचा २-६, ६-३, ७-६ असा पराभव केला. अव्वल मानांकित नाओमी ओसाकाने पोलंडच्या ५३ वी मानांकित माग्डा लिनेटवर ६-२,६-४ ने विजय मिळविला.

आंद्रिया पेतकोविचने झेक प्रजासत्तकाची सहावी मानांकित पेट्रा क्विटोवा हिचा ६-४, ६-४ असा पराभव केला.शरण-नीस जोडी सलामीला पराभूतभारताचा दिविज शरण आणि मोनाकोचा त्याचा जोडीदार हुगो नीस यांची जोडी यूएस ओपन पुरुष दुहेरीत पहिल्याच फेरीत पराभूत झाली. या जोडीला रॉबर्ट कारबालेस- फेडरिको डेलबोनिस यांनी ४-६,४-६ ने हरविले. ७२ मिनिटे चाललेल्या या सामन्यात शरण- नीस यांना एकही ब्रेक पॉर्इंट मिळविता आला नाही. आॅस्ट्रेलिया ओपनच्या पहिल्या फेरीत पराभूत झाल्यानंतर शरण यांच्या जोडीला वर्षभरात दुसऱ्यांदा हा धक्का बसला आहे.