Miami Open:व्हिनस उपांत्यपुर्व फेरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 03:52 IST2018-03-28T03:52:12+5:302018-03-28T03:52:12+5:30

सलोनी स्टिफन्सने जगातील तिसऱ्या क्रमांकाची खेळाडू गर्बाइन मुगुरूजा हिला मियामी ओपन टेनिस

Miami Open: Venus in the quarter-finals | Miami Open:व्हिनस उपांत्यपुर्व फेरीत

Miami Open:व्हिनस उपांत्यपुर्व फेरीत

मियामी : सलोनी स्टिफन्सने जगातील तिसऱ्या क्रमांकाची खेळाडू गर्बाइन मुगुरूजा हिला मियामी ओपन टेनिस स्पर्धेत पराभूत केले. अन्य सामन्यात दिग्गज व्हिनस विल्यम्स हिने ब्रिटनच्या योहाना कोंटा हिला पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीत जागा मिळवली.
युएस ओपन चॅम्पियन स्टिफन्स हिने स्पेनच्या विम्बल्डन विजेत्या मुगरुजा हिला ६-३, ६-४ असे पराभूत करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला.
जगातील १२ व्या क्रमांकाची खेळाडू स्टिफन्सचा सामना आता जर्मनीच्या अँजेलिक कर्बर हिच्याशी होईल. कर्बरने चीनच्या वागं यफान हिला ६-७(१-७), ७-६(७/५), ६-३ असे पराभूत केले.
व्हिनस विल्यम्स हिनेदेखील उपांत्य फेरी गाठली आहे. तिने ब्रिटनच्या योहाना कोंटा हिला ५-७,६-१,६-२ असे पराभूत केले. बेलारुसच्या व्हिक्टोरिया अजारेंका हिने पोलंडच्या एग्निस्का रादवंस्का हिला ६-२,६-२ असे पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
कजाकिस्तानच्या जरीना डायस ही सामन्यातून हटल्याने चेक गणराज्याच्या पाचव्या मानंकित कॅरोलिना प्लिस्कोव्हा हिला उपांत्यपूर्व फेरीत जागा मिळाली. जरीना सामन्यातून बाहेर पडली तेव्हा प्लिस्कोव्हा ६-२,२-१ अशी पुढे होती. (वृत्तसंस्था)

Web Title: Miami Open: Venus in the quarter-finals