मेलबर्न : अनुभवी लिएंडर पेस आणि पूरव राजा यांनी पाचव्या मानांकित ब्रुनो सोरेस आणि जॅमी मरे यांना पराभूत करत आॅस्ट्रेलियन ओपन पुरुष दुहेरी गटात तिस-या फेरीत प्रवेश केला आहे. भारताच्या बिगर मानांकित जोडीने ब्राझीलच्या सोरेस आणि ब्रिटनच्या मरे यांना ७-६, ५-७, ७-६ असे पराभूत केले. दुहेरीत जगातील नवव्या क्रमांकाचा खेळाडू मरे आणि दहाव्या क्रमांकावर असलेला सोरेस गेल्या वर्षापासून चांगला खेळ करत आहे. मात्र राजासमोर ते टिकू शकले नाहीत. सुरुवातीला ही लढत बरोबरीत होती. पहिल्या दोन सेटमध्ये बरोबरी साधल्यानंतर तिसºया सेटमध्ये लढत ५-५ अशी बरोबरीत होती. त्या वेळी मरेने संघाला मॅच पॉर्इंट मिळवला. राजा याने हा मॅच पॉर्इंट वाचवला आणि मॅच पॉर्इंट मिळवलादेखील. गेल्या सत्रात चॅलेंजर स्तरावर दोन स्पर्धा जिंकलेले राजा आणि पेस ही दुसरी ग्र्रॅण्ड स्लॅम सोबत खेळत आहेत. गेल्या वर्षी अमेरिकन ओपनच्या दुसºया फेरीत ते पराभूत झाले होते. आता त्यांचा सामना कोलंबियाच्या ११ व्या मानांकित जुआन सेबेस्टिअन काबाल आणि रॉबर्ट फारा यांच्याशी होणार आहे.
लिएंडर पेस आणि पूरव राजा उपउपांत्यपूर्व फेरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2018 01:30 IST