शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

केवळ ५ महिन्यांत सानियाने घटवलं २२ किलो वजन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2019 01:06 IST

तुम्ही सेलिब्रिटी असा किंवा सामान्य नागरिक, वजन कमी करणे ही एका रात्रीमध्ये होण्यासारखी गोष्ट अजिबात नाही.

मुंबई : तुम्ही सेलिब्रिटी असा किंवा सामान्य नागरिक, वजन कमी करणे ही एका रात्रीमध्ये होण्यासारखी गोष्ट अजिबात नाही. यासाठी दिवस-रात्र मेहनत घ्यावी लागते. अनेक सेलिब्रिटींची तंदुरुस्ती पाहून आपण वजन कमी करण्यासाठी प्रोत्साहित होतो खरे; परंतु त्यांचे डाएट फॉलो करणे सर्वांना शक्य असेलच असे नाही. जर तुम्ही वजन कमी करण्याच्या विचारात असाल, तर याबाबतीत टेनिसस्टार सानिया मिर्झाकडून टिप्स घेऊ शकता. एका वृत्तपत्राने दिलेल्या महितीनुसार, सानियाने गरोदरपणानंतर केवळ ५ महिन्यांमध्येच २२ किलो वजन कमी केले आहे.गरोदरपणात सानियाचे वजन फार वाढले होते आणि हे वजन कमी करणे तिच्यासाठी आव्हान होते. परंतु बाळंतपणानंतर ५ महिन्यांमध्येच तिने वजन कमी करण्यात यश मिळविले. गरोदरपणात सानियाचे वजन ८९ किलो होते. बाळंतपणानंतर १५ दिवसांनी तिने व्यायाम करण्यास सुरुवात केली.यामुळे सानिया सर्व मातांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. ती आपल्या वर्कआउटचे व्हिडीओ  #momohustles या हॅशटॅगसह पोस्ट करते. याबाबत तिने सांगितले की, ‘यामागील कारण म्हणजे, आई झाल्यावरही तुम्ही स्वत:ला फिट ठेवू शकता. हा संदेश मला इतर महिलांपर्यंत पोहोचवायचा आहे.’सानियाने गरोदरपणामध्येही स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी प्रीनेटल योगचा आधार घेतला आणि वर्कआउटही सुरू ठेवलं. सानिया आपल्या वाढलेल्या वजनाने खूश नव्हती. एका मुलाखतीमध्ये तिने म्हटले होते की, ‘मी टेनिस खेळत असो किंवा नसो. परंतु जेव्हा मी स्वत:ला आरशात पाहते त्या वेळी मी पहिल्यासारखी अजिबात वाटत नाही.’ सानिया खाण्याची शौकीन आहे. मात्र बाळंतपणानंतर तिने आपल्या डाएटचे अगदी काटेकोरपणे पालन केले.योगाचाही परिणामसानिया दररोज जिममध्ये ४ तास व्यायाम करते. याव्यतिरिक्त १०० मिनिटांसाठी कार्डिओ, एका तासासाठी किक बॉक्सिंग आणि पिलाटेचंही ट्रेनिंग घेते. या सर्व एक्सरसाइज व्यतिरिक्त सानियाने योगाचाही दैनंदिन वेळापत्रकामध्ये समावेश केला होता. त्यामुळेच वजन कमी करण्यात यशस्वी ठरलेली सानिया आता अधिक तंदुरुस्त दिसत आहे.

टॅग्स :Sania Mirzaसानिया मिर्झा